Download App

वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलं..,; बाळासाहेब थोरातांचा घणाघात…

Balsaheb Thorat News : तुमच्या वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलंयं, पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष होता तुम्ही काँग्रेस सोडण्याचा असा घणाघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सडकून टीका केली आहे.

व्हॅलेंटाईन्स डे विशेष : रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

बाळासाहेब थोरात म्हणाले, अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेससाठी खूप काही केलं. ते मुख्यमंत्री राहिले त्यांचे चिरंजीव म्हणून अशोक चव्हाण यांना काँग्रेसने संधी दिली. ते मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिले. आत्तापर्यंत ते तत्वज्ञानवर भाषण करत होते पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडली.. त्यांच्यावर कोणता दबाव होता..काय कारण होतं..त्यांनी काँग्रेस सोडावं. याचा अर्थ ते दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात गेले असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Israel Hamas War : गाझात इस्त्रायलचे हवाई हल्ले; 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

तसेच ज्या पद्धतीने राज्य सरकार बनलं आहे, त्याला खोके सरकार म्हणतात. ज्यांच्यावर पंतप्रधान आरोप करतात, त्यानंतर ते सरकारमध्ये जातात. आता अशोक चव्हाणांवर कोणतातरी दबाव आहे किंवा स्वार्थ आहे त्याच्याशिवाय ते भाजपात जाऊच शकत नाहीत. हे जे चाललं ते चुकीचं चाललं आहे, महाराष्ट्र इतका अस्थिर कधीही नव्हता. स्वायत्त संस्थांचा गैरवापर कधीच झाला नव्हता. 15 तारखेला आमची एक बैठक होणार असून आम्ही राज्यसभा निवडणूकही जिंकणार आहोच. सोबतच लोकसभेलाही आघाडी म्हणून आम्हालाच अधिक जागा मिळणार आहेत. राज्याच्या जनतेच्या मनात आघाडीचंच सरकार असल्याची शाश्वतीच बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर परखड टीका करत त्यांनी आपला निर्णय बदलावा असंही आवाहन केलं. अद्यापही काही बिघडलं नाही अशोक चव्हाण यांनी मागं फिरावं, नाही तर मागच्या रांगेत बसावे लागेल, असा टोलावजा सल्ला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.

follow us