व्हॅलेंटाईन्स डे विशेष : रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

व्हॅलेंटाईन्स डे विशेष : रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

Valentine’s Day Special : महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा (Ek Ti Movie)’व्हॅलेंटाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ (Ultra Zakas)मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर (World Digital Premiere)करण्यात आला.

Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन

या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून, चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम(Vijay Kadam), अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रुपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहेत.

“PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो…” : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने

या चित्रपटात व्यक्ती आवडणं, प्रेम व्यक्त करणं, प्रेमात बेधुंद होणं, वाट्याला विरह येणं हे सगळं पाहायला मिळणार आहे. या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते, असं म्हणतात. अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मनस्वी आनंद होत आहे.

अशा प्रकारचे दर्जेदार चित्रपट ‘अल्ट्रा झकासवर’ संकलित करण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे. असे अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सीइओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज