Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन

Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन

Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत चालल्या आहेत तसे इंडिया आघाडीला (INDIA Alliance) धक्के बसू लागले आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी दिलेल्या झटक्यांतून सावरत असतानाच दिल्लीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आणखी एक धक्का दिला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर आपने काँग्रेसला सरळसरळ इशारा दिला आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने काँग्रेसला दिल्लीत फक्त एक लोकसभा (Lok Sabha Election) मतदारसंघ देऊ केला आहे. आपचे नेते संदीप पाठक म्हणाले, आम्ही दिल्लीत काँग्रेसला एका जागेचा प्रस्ताव दिला आहे. आम आदमी पार्टी सहा जगांवर निवडणूक लढणार आहे.

आम्ही दिलेल्या प्रस्तावावर जर काँग्रेसने वेळेत उत्तर दिले नाही तर आम आदमी पार्टी उर्वरित जागांवरही उमेदवार घोषित करील. संदीप पाठक यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पंजाब आणि दिल्लीत इंडिया आघाडीच्या स्थितीवर चर्चा सुरू आहे. पंजाबमधील तरनतारन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व सात जागांवर उमेदवार देण्याचे संकेत दिले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या वक्तव्यावरूनही आघाडीवर संकट दिसत होते.

INDIA सारखी आमच्या आघाडीची अवस्था होऊ देणार नाही! एन्ट्री होताच आंबेडकरांनी स्वीकारले ‘मविआ’चे पालकत्व

मागील काही दिवसांत इंडिया आघाडीला तीन मोठे झटके बसले आहेत. सर्वात आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आघाडीला धक्का एनडीएत वापसी केली. उत्तर प्रदेशात आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनीही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीसोबत जाणार असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी दोन डझनहून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. पण, त्या आघाडीच्या एकजुटीची गाठ सुटू लागल्याचं चित्र आहे. त्या आघाडीला ममतांनी पहिला धक्का दिला. त्यांनी बंगालमध्ये एकला चलो रे घोषणा केली. नितीश यांनीही इंडियाशी फारकत घेतली. ते पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले. आता केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आणि दिल्लीत आम आदमी पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केलं.

Arvind Kejriwal : केजरीवाल यांची अशीही ‘गांधीगिरी’, आज दिवसभर करणार ध्यान, कारण 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज