“PM मोदींचे काम पाहून इम्प्रेस झालो…” : भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाणांची स्तुतीसुमने
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत काम करत आहेत. त्यांनी जे काम केले आहे ते पाहून मी इम्प्रेस झालो आहे. जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणायला पाहिजे. आता पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर मला चालायचे आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे तोंडभरुन कौतुक केले. (After joined the BJP, former Chief Minister Ashok Chavan praised Prime Minister Narendra Modi)
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. चव्हाणांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आज (13 फेब्रुवारी) त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
चांगले बदलच दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची? अशोक चव्हाणांचा खरा राग नाना पटोलेंवरच!
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, विरोधात आणि सत्तेत असतानाही आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. आम्ही नेहमी विकासाला साथ दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला नेहमी सकारात्मकरित्या साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करेन. मी व्यक्तिगत टीका कोणावर करणार नाही, दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही, 38 वर्षांनंतर भाजपच्या माध्यमातून नवीन सुरुवात करत आहे. असेही त्यांनी स्पष्ट स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांचे कौतुक :
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत काम करत आहेत. त्यांनी जे काम केले आहे ते पाहून मी इम्प्रेस झालो आहे. जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणायला पाहिजे. आता पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर मला चालायचे आहे. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. म्हणून मी लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. आता पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चव्हाणांच्या राजीनाम्याची मुहूर्तमेढ आठ महिन्यांपूर्वीच रोवली होती! शरद पवारांच्या नेत्याचा बडा दावा
पहिल्याच भाषणात अशोक चव्हाण गडबडले :
“आज इथे उपस्थित मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार…” नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या तोंडातून पक्षप्रवेशावेळच्या पहिल्याच भाषणातील पहिल्याच वाक्याला गेल्या 50 वर्षांची काँग्रेसची सवय दिसून आली. चव्हाण यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच त्यांना “भाजपचे, मुंबई भाजपचे” अशी सुधारणा करुन दिली. या प्रसंगानंतर भाजपच्या कार्यालयात जोरदार हशा पिकला. चव्हाण यांच्यासह फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पाठीमागे बसलेले हर्षवर्धन पाटील असे सगळेच नेते गदगद हसू लागले.