Download App

आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक; काँग्रेस नेत्याचा भाजपवर हल्लाबोल…

आधी इकबाल मिर्ची गोड केली, आता कुत्ताशी सोयरिक केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केलायं.

Harshwardhan Sapkal On BJP : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर काल सुधाकर बडगुजर यांनी मुंबईत भाजपात प्रवेश केला. बडगुजर यांच्या या प्रवेशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलायं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला खोचक सवाल केले आहेत.

हिंदी भाषा सक्तीची अनिवार्य असा शब्द कुठंय?, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मंत्री भुसेंचा प्रतिसवाल

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत डान्स करतानाचा सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर विधीमंडळात नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता प्रकरणाचा धागा पकडत निशाणा साधलायं.

भारत-पाक युद्धात आम्ही कुणाची मध्यस्थी स्वीकारली नाही; पीएम मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं

हर्षवर्धन पाटील म्हणाले, हाताच्या कंगणाला आरसा कशाला? आधी इक्बाल मिर्चीशी संबंधित नेत्याला सत्तेत सामिल करुन घेत मिर्ची गोड केली, आता कुत्तासोबत सोयरीक करीत आहेत. बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यासाठी दाऊदने शिफारस केली होती का? असा थेट सवालही सपकाळ यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊस इब्राहिमचा साथीदार असलेला सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे फोटो व्हायरल झाले होते. बडगुजर यांचे कुत्तासोबत संबंध असल्याचा थेट आरोप भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यावेळी बडगुजर हे उद्धव ठाकरे गटात होते. पक्षफुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहिले. पण पक्षात सन्मान होत नसल्याचा आरोप करीत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलायं. त्यांनी आता आपल्या हाती कमळ घेतलंय.

बडगुजर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान, अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीला बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ही दुपारी 2 वाजताची देण्यात आली. ठरलेल्या वेळेनुसार मंत्री गिरीश महाजनांसह इतर भाजप नेते कार्यालयात पोहोचले खरे पण चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे पोहोचलेच नाहीत. अखेर अनेकांना फोन केल्यानंतर बावनकुळे आणि चव्हाण हे पक्ष कार्यालयात आले.

follow us