भाजप सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत, मोदींच्या सत्तेचं महाराष्ट्रातून पतन होणार; पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखांची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आज मणिपूर येथून निघालेली कॉंग्रेसची न्याय यात्रा मुंबईत आली आहे. या यात्रेचं स्वागत करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदारी टीका केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) […]

Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून नाना पटोलेंनी कुणाला सुनावले ?

Nana Patole

Nana Patole : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखांची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आज मणिपूर येथून निघालेली कॉंग्रेसची न्याय यात्रा मुंबईत आली आहे. या यात्रेचं स्वागत करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंन (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदारी टीका केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या पतनाला महाराष्ट्रातून सुरूवात झाल्याचा दावा पटोलेंनी केला.

अदा शर्माच्या ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त… 

केंद्र सरकार महाभारतातील धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सत्तेचे महाराष्ट्रातूनच पतन होणार हे नक्की आहे, असं पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूर येथून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात पोहोचली. भाजपच्या राज्यात या यात्रेला कशी वागणूक मिळाली हे सर्वश्रुत आहे. राहुल यांच्या ताफ्यावर अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी त्यांना मंदिरात प्रवेशही नाकारण्यात आला. हे निषेधार्ह आहे. तुम्हाला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार नाही, आम्हीच धर्माचे ठेकेदार आहोत, अशी भाजपची भूमिका आहे. हे सरकार महाभारतातील धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. त्यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा नाही, ते मणिपूरमधील हिंसाचारावर एक शब्दही बोलत नाही, त्यामुळं मोदींच्या सत्तेचं पतन होणार हे नक्की, असं पटोले म्हणाले.

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 301 रिक्त जागांसाठी भरती सुरू 

भाजपने चारशे पारचा नारा दिला. मोदींची गॅंरटीही भाजपकडून देण्यात येत आहे. यावरही पटोलेंनी भाष्य केलं. महिला शक्ती पुन्हा बळकट करण्यासाठी आम्ही 5 गॅंरटी दिल्या. भाजप मोदींची गॅंरटी असं देत आहेत. खरंतर मोदींची गॅंरटी हा जुमला आहे. खरी गॅरंटी काँग्रेसने दिल्याचं ते म्हणाले.

राहुल गांधी एखाद्या तपस्वीसारखे काम करत आहेत. त्यांनी लोकांच्या वेदना आणि प्रश्न समजून घेण्यासाठी देशभर प्रवास केला. तरुण, महिला, शेतकरी आदी सर्व समाज घटकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. मणिपूर ते मुंबई असा 6000 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर केवळ राहुल गांधीच लोकांचे नेतृत्व करू शकतात, असा लोकांचा विश्वास आहे. या यात्रेच्या माध्यमातून गरीब, मजूर, शेतकरी आदींना न्याय देण्याची गॅंरटी राहुल यांनी दिली, असंही पटोले म्हणाले.

हजारो कोटी रुपये कसे मिळाले?
इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावरूनही नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. आमच्या इलेक्टोरल बाँड्सचा हिशोब घ्या. पण, त्यांनी हजारो कोटी रुपये कसे मिळाले? हे सांगावं.. काँग्रेस आपल्या मुख्यमंत्र्यांचे काही चुकले तर ते लगेच दखल घेऊन त्यांची उचलबांगडी करतो. पण, भाजप असे काहीच करत नाही, असं पटोले म्हणाले.

Exit mobile version