Nana Patole On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी कितीही पत्र व्हायरल केली तरी जनतेला हे पचणार नसून त्यांना फळं भोगावीच लागणार असल्याचा टोला काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक पत्रच ट्विट करुन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रावरुन नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच… pic.twitter.com/3fIlE1DFQU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 25, 2024
नाना पटोले म्हणाले, अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं तरी जनतेला हे पचनी पडणार नाही. त्यांना याची फळं भोगावी लागणारच. भाजप आमदार म्हणतात की, मराठा समाजावर उपकार आहेत. आता भाजपचे मराठा समाजावर किती उपकार आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल. जनता त्यांना धडा शिकवेल. मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते अशी स्टोरी सांगत असल्याची टोलेबाजीही नाना पटोले यांनी केलीयं.
दरम्यान, अजित पवार यांनी ट्विट करुन एक पत्र जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. महायुतीसोबत गेल्यानंतर याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं त्यांनी हे ट्विट केलं आहे. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.
फडणवीसांना शिव्या घालताच पडसाद…
मनोज जरांगे यांनी आम्हाला आधी शिव्या घातल्या आहेत. आता फडणवीसांना शिव्या घातल्यावर लगेच कसे पडसाद उमटू लागले आहेत. आम्ही काय माणसं नाही का? आम्ही शिव्या दिल्या याचं समर्थन करत नाही. पण चित्र कसं आणि का बदलले हे सर्वांसमोर असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
ड्रग्जमाफिया जावई आहेत काय?
देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, आज ड्रग्स माफियाचे जाळे पसरले आहेत. ड्रग्स माफिया काय जावई आहेत का? गुटखा विक्री होते, विक्री करणारे जावई आहेत का? मग अशावेळी जरांगे यांनी हत्येच्या कटाचा आरोप केला, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केलीयं.