हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरुममध्ये लपायचे, आव्हाडांनी अजित पवारांना धू धू धुतले

हिंदी-इंग्रजी येत नाही म्हणून बाथरुममध्ये लपायचे, आव्हाडांनी अजित पवारांना धू धू धुतले

Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला दिले आहे. यावरुन दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती. स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की बाथरूममध्ये असायचे. कारण त्यांना हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत नाही, त्यांच्या ह्या मर्यादा महाराष्ट्राला माहिती नव्हत्या पण आता आम्हाला हे सांगावं लागलं, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Ramdas Kadam : …तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासायचे; रामदास कदमांचं थेट आव्हान

ते पुढं म्हणाले की जेव्हा जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा ते बाथरुममध्ये असायचे, जेव्हा जेव्हा शरद पवारांची लोकप्रियता शिखरावर असायची तेव्हा तेव्हा खालून पिन मारुन हवा काढायचे, राजीनामा द्यायचे, काहीतरी विचित्र बोलायचे. पुणे जिल्हा बॅंकेत त्यांनी केलेले घोटाळे शरद पवारांवर आले होते. मग दु:ख व्यक्त करत राजीनामा दिला. ही नाटकं कशाला केली? चार वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं ते फक्त शरद पवार यांच्यामुळे मिळालं, हे उपकार निदान मनात तर ठेवा, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्था भाजपकडून खालसा : 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तेत

इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेला नाही. परत रक्ताचे नातं जोडता, मी तुमच्या भावाचा मुलगा होतो. अरे भावाचा मुलगा होता म्हणूनच चार वेळा उपमुख्यमंत्री केलं, त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनचं सगळं माफ केलं. आमच्यासारख्या माणसाने असं केलं असतं तर लाथ मारुन हाकलून दिलं असतं, अशी हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

विधान परिषदेला विसरले, राज्यसभेला डावलले… हर्षवर्धन पाटलांवर आता थेट केंद्रात नवी जबाबदारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज