Shubhangi Patil : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिरनंतर बडा नेता सोडणार पक्षाची साथ
Shubhangi Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अतंर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांना शिवसेनेत प्रवेश देत माजी
Shubhangi Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अतंर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांना शिवसेनेत प्रवेश देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. तर आमदार सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी संधी देत एक महिन्याच्या आत दुसरा मोठा धक्का दिल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. तर आता आणखी काही ठाकरे गटाचे आमदार पक्षाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु असताना ठाकरे गटातील एक बडा नेता पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) उपनेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. याबाबत पुढील काही दिवसात शुभांगी पाटील निर्णय घेणार असं देखील सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांनी या वृत्ताचं खंडण केलं आहे. आपण कुठेही जाणार नसल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या शुभांगी पाटील
आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही. आपण ज्या दिवशी प्रवेश करु त्या दिवशी सर्वांना सांगून प्रवेश करु. आता कुठल्याही निवडणुका नाहीत आणि अर्जही भरायचा नाही, त्यामुळे पक्षप्रवेशेचा काहीच संबंध नाही असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ चा दमदार टीझर आऊट, ‘या’ दिवशी जगभरात प्रदर्शित होणार चित्रपट –
तसेच शिक्षक संघटनेच्या माध्यमातून माझं राज्यभरात काम आहे. ज्या दिवशी शिक्षकांच्या समस्या समजून घेईल, त्या दिवशी सर्वांना विचारुन पत्रकारांना नक्की माहिती दिली जाईल असं देखील सुभांगी पाटील यांनी म्हटलं आहे.