अशोक चव्हाणांनी मागं फिरावं अन्यथा शेवटच्या लाईनमध्ये बसावं लागेल, नाना पटोलेंचा टोला

अशोक चव्हाणांनी मागं फिरावं अन्यथा शेवटच्या लाईनमध्ये बसावं लागेल, नाना पटोलेंचा टोला

Nana Patole On Ashok Chavan : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी त्यांच्यावर परखड टीका करत त्यांनी आपला निर्णय बदलावा असंही आवाहन केलं. अद्यापही काही बिघडलं नाही अशोक चव्हाण यांनी मागं फिरावं, नाही तर मागच्या रांगेत बसावे लागेल, असा टोलावजा सल्ला नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.

शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर धडकलं; मोर्चावर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

आज कॉंग्रेसच्या आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, अशोक चव्हाण यांना नेतृत्व करण्याची कायम इच्छा होती आणि त्यांना कॉंग्रेसमध्ये नेतृत्व करण्याची कायम संधी दिली.

अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश का केला? थोरातांनी खरं कारण सांगितलं

त्यांच्याबरोबरच्या रांगेमध्ये अनेक वरिष्ठ नेते होते. पण अशोक चव्हाण यांना एकदा नाही तर दोनदा मुख्यमंत्री केलं. पण आत्ता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

माझा भाजपमध्ये थोडा अनुभव आहे. आत्ता त्यांना भाजपमध्ये मागच्या लाईनमध्ये बसावं लागणार आहे. त्यामुळे अद्यापही काही बिघडलेलं नाही. त्यामुळे आमची नम्र विनंती आहे की, त्यांनी आपला निर्णय मागे घेऊन त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्येच यावं असं आवाहन नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज