Download App

‘पुणे लोकसभेची जागा काँग्रेसचीच’, नाना पटोलेंना ठोकला शड्डू; अजितदादांना दिले थेट उत्तर

Nana Patole On  Ajit Pawar :  पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावरुन महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झालेली दिसून येते आहे.

पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच पहायला मिळते आहे. पुण्याची लोकसभेची जागा ही परंपरागत काँग्रेस लढवते. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसते आहे. याआधी जयंत पाटील यांनी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी पुणे लोकसभेची जागा आम्ही काँग्रेसकडून मागू असं म्हटलं होतं. अजित पवार यांनीही ज्याची ताकद जास्त त्यांनी जागा लढवावी असं वक्तव्य केलं होतं.

Pune Loksabha : जगदीश मुळीक लोकसभेत जाणार? पक्षाकडे बोट दाखवत लावली उमेदवारीसाठी फिल्डिंग

यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. ज्याचं मेरिट त्याला जागा मिळायला हवी. २०१४, २०१९ आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. आता निवडणुका होणार आहे. या निवडणुकीतली परिस्थिती ओळखूनच निर्णय घेतला जाईल. मेरिटच्या आधारावर हा निर्णय घेऊ, असे पटोले म्हणाले आहे.

तसेच लोकसभेच्या जागांवर मेरिटच्या आधारावर निर्णय घेतला जावा हेच सर्वांच मत आहे. काँग्रेसचं मेरिट असेल तर काँग्रेस बिलकूल या जागेवर दावा करेल. पुण्यात कांग्रेसचं मेरिट आहे. विधानसभा आणि लोकसभेत जी परिस्थिती असेल त्यावर निर्णय घेतला जाईल, असे पटोले म्हणाले.

Video : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ मनोज वाजपेयीची लढाई

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील या जागेच्या विषयावर चाललेल्या गोष्टीवर भाष्य केले आहे. कसेल त्याचीजमिन या प्रमाणे..जो जिंकेल त्याची जागा.हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल.जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us