Pune Loksabha : जगदीश मुळीक लोकसभेत जाणार? पक्षाकडे बोट दाखवत लावली उमेदवारीसाठी फिल्डिंग

Pune Loksabha : जगदीश मुळीक लोकसभेत जाणार? पक्षाकडे बोट दाखवत लावली उमेदवारीसाठी फिल्डिंग

पुणे : “प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी. कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल.”, असं म्हणतं भाजपचे (BJP) पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारीच्या चर्चांवर भाष्य केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर शहर लोकसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबlच्या चर्चा सुरु आहेत. सध्या भाजपकडून 5 ते 6 नावं चर्चेत आहेत. यात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचेही नाव चर्चेत आहे. (Pune Loksabha Bye Election 2023, BJP, Congress, NCP)

काय म्हणाले जगदीश मुळीक?

भाजपचा उमेदवार ठरला आहे का? मध्यंतरी भावी खासदार म्हणून तुमच्या नावाचे फ्लेक्स लागले होते. याबाबत विचारणा केली असता मुळीक म्हणाले, त्याबाबतीत मी मागेच स्पष्टीकरण दिलं आहे, ते बोर्ड कोणी लावले हे माहित नाही. आता तो विषय जुना झाला आहे.

तुमच्या नावाचीही चर्चा आहे, तुमची इच्छा आहे का निवडणूक लढविण्याची? या प्रश्नांवर उत्तर देताना मुळीक म्हणाले, प्रत्येक पक्षामध्ये उमेदवाराची स्पर्धा नक्की असावी. आमच्या पक्षात 4, 5, 6 उमेदवार असतील तर चांगलचं आहे. प्रत्येकाने पक्षाकडे उमेदवारी मागावी. कोणाला उमेदवारी द्यायची, हे पक्ष ठरवेल. हीच आमची कायमची पद्धत आहे. पण अखेरीस पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करायचा हे आमचे तत्व आहे. कमळ हाच आमचा उमेदवार आहे. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण देखील निश्चित निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघांपैकी पुणे शहर मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. बारामती, मावळ, शिरुर राष्ट्रवादीकडे आहे. पण आता राहिलेला मतदारसंघाही काँग्रेसकडून हिसकावून घेण्याच्या भूमिकेत राष्ट्रवादी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत प्रचंड संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष निवडणुकीपर्यंतही कायम राहिलं. मात्र जर पुण्यात पोटनिवडणूक लागली तर भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास देखील जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

प्रशासनाकडून तयारी सुरु :

दरम्यान, या पोनिवडणुकीसाठी प्रशासनही तयारीला लागले आहे. कर्नाटक निवडणूक संपन्न झाल्यानंतर बंगळुरूहून पुण्याला 4 हजार 200 मतदान यंत्रे आणि 5 हजार 70 व्हीव्हीपँट मशिन्स दाखल झाली आहेत.  या मशिन्सवर पुणे पोटनिवडणूक (Pune By Election) असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. यासोबतच 30 इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या अद्यायावत करणे आणि मतदान केंद्रे निश्चित करण्याची काम पण पूर्ण झाली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube