Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात खळबळ उडाली. या घटनांमुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
नॅशनल क्रश रोहित सराफची प्राजक्तासह रोमँटिक हैदराबाद सफर!
भाजपने महाराष्ट्रात गुंडाराज आणले आहे. सत्ताधारी सर्रास धमक्या देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. राज्यातील जनता भयभीत आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
पटोलेंनी एक्सवर एक पोस्ट लिहिली, त्यात त्यांनी लिहिलं की, एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे की, भाजप सरकारमुळे गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूर पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर ठाणे, मुंबई आणि पुणे यांचा क्रमांक लागतो. राज्यात खैरात वाटल्याप्रमाणे बंदुकांचे परवाने दिले जात आहेत. तडीपार गुंडांना पोलिस संरक्षण दिले जात आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा
त्यांनी पुढं लिहिलं की, काही भ्रष्ट आणि कलंकित आयपीएस अधिकाऱ्यांना नियम डावलून पदोन्नती दिली जात आहे. तर प्रामाणिक आणि इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केलं जात आहे. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत. गुंडांनी सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जर थोडीही नैतिकता शिल्लक राहिली असेल, जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोलेंनी केली.
महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ उद्या राज्यपालांना भेटणार.
गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय व लाचार; त्यांना माणूस व कुत्र्यामधील फरकही समजेना !
तडीपार गुंडांना राजाश्रय… pic.twitter.com/kYqhrWllDZ
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 9, 2024
यावेळी पटोलेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांनी लिहिलं की, भाजपने महाराष्ट्रात गुंडाराज आणले आहे. सत्ताधारी सर्रास धमक्या देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. राज्यातील जनता भयभीत आहे. महिला असुरक्षित आहेत. दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर असून सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. तीन खोक्यांमधील सत्तासंघर्षात जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.