Download App

Prithviraj Chavan : फडणवीसांच्या मर्जीनेच शिंदे CM अन् अजितदादा DCM; चव्हाणांच्या दाव्याने खळबळ!

Prithviraj Chavan : महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाच्या साथीने शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एक वर्षांनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादीत बंडाचे निशाण फडकावत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. अजित पवार आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. या दोन्ही बंडात भाजपाचा छुपा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यात सूत्रधार असल्याच्याही चर्चा होत्या. आता याच चर्चांना बळ देणारं वक्तव्य काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्या पत्रामुळे उठलेल्या गदारोळावर भाष्य केलं. तसेच त्यांनी फडणवीस यांनी अजितदादांना पत्र का लिहिलं याचं कारणही सांगितलं. फडणवीस अजित पवार यांना फोन करुन किंवा प्रत्यक्षही सांगू शकत होते. पण, त्यांनी तसं केलं नाही तर पत्र लिहिलं. कारण, त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं होतं. ती संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी तसंच केलं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Nawab Malik : एका किडनीने जगणारे अनेक जण आहेत, मलिकही : जामीन अर्जाला ईडीचा विरोध

नवाब मलिक यांना महायुतीत घ्यायचं की नाही हे फडणवीसच ठरवू शकतात कारण युतीत सर्वात मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. आज फडणवीसांच्याच मर्जीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. कारण, महायुतीत फडणवीस यांच्या पक्षाचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ते हा निर्णय घेऊ शकतात असे चव्हाण म्हणाले.

भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतलं पण.. 

तुम्ही अनेक भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतलं. ज्यांच्यावर पंतप्रधानांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाही तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं. आता जर भ्रष्टाचाराचं कारण पुढं केलं जात असेल तर यात काही तथ्य नाही. सगळ्या बकवास गोष्टी आहेत. पत्र लिहिण्याचं कारण काय तर त्यांना धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे. संधी मिळाली त्यांनी ते केलं, असा आरोप चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्राच्या मुद्द्यावर केला.

Tags

follow us