‘मलिक कोणत्या गटात माहित नाही, पत्राचं काय करायचं ते मी करीन’; फडणवीसांच्या पत्रावर अजितदादांचा भडका

‘मलिक कोणत्या गटात माहित नाही, पत्राचं काय करायचं ते मी करीन’; फडणवीसांच्या पत्रावर अजितदादांचा भडका

Ajit Pawar : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल मलिक (Nawab Malik) थेट सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले. हे दृश्य पाहताच विरोधकांनी भाजपला घेरले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचं पत्र मला मिळालं. पत्र मी वाचलं. याबाबत काय निर्णय घ्यायचा तो मी घेईल. मीडियाला सांगण्याची गरज नाही. नवाव मलिक काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. अजून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांची भूमिका ऐकल्यानंतरच मी माझं मत देईल. सभागृहात कुणी कुठं बसायचं हा माझा अधिकार नाही. तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात.

Ajit Pawar यांनी दावा ठोकलेल्या जागांवर 2014 अन् 2019 मध्ये कुणी मारली होती बाजी?

फडणवीस यांचं पत्र मला मिळालं. पत्र मी वाचलंही आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा तो मी घेईल. मीडियाला सांगण्याची गरज नाही असे अजित पवार यांनी म्हणताच पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अजित पवारही वैतागल्याचे दिसत होते. नवाब मलिक प्रकरणात भाजपबरोबरच अजित पवार गटाचीही कोंडी झाली आहे. आता भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

तुझ्याकडे पुरावा आहे तर मग दाखव ना 

दरम्यान, यावेळी अजित पवार पत्रकारांवरही चांगलेच भडकल्याचे दिसून आले. कोणतीही माहिती नसताना कुणी काही सांगितलं म्हणून बोलायंच हेच तुमचं चुकीचं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्या पत्रावर तुमची सही असल्याचे एका पत्रकाराने विचारल्यानंतर अजितदादा मात्र चांगलेच चिडले. कुठंय ते पत्र दाखवना मला. आहे ना मग पुरावा दाखव. हे जे काही तुम्हा लोकांचं जे चालतं ना तेच मला आवडत नाही. काही माहिती नाही कुठल्या तरी कंड्या पेटवायच्या. कुणाचं तरी ऐकायचं आणि बोलायचं. पुरावा आहे तर दाखव.

Devendra Fadanvis : आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मलिकांचं ऐकल्यानंतरच मी बोलेन 

आम्ही 2 जुलै रोजी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारसोबत गेलो. या सर्व घटनांनंतर नवाब मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले होते. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका ऐकल्यानंतरच मी माझं मत देईल, असे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube