Download App

सोयाबीन 7 हजार प्रतिक्विंटल, कांदा अन् कापसालाही योग्य भाव; राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी तीन आश्वासने

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Mahavikas Aghadi Three Promises To Farmers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज तीन मोठी आश्वासने दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे, असल्याचं देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

राहुल गांधी यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलणार आहे. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल सात हजार एमएसपी + सोयाबीनसाठी बोनस, तसंच कांद्याला रास्त भाव ठरवण्यासाठी समिती, कापसासाठीही योग्य एमएसपीची व्यवस्था केली जाईल, असं राहुल गांधींनी म्हटलंय. भाजप गेल्या तीन निवडणुकांपासून सोयाबीनसाठी 6 हजार रुपये एमएसपीचे आश्वासन देत आहे, परंतु आजही शेतकरी त्यांचे पैसे देत नाहीत. रक्त आणि घाम गाळून पिकवलेले सोयाबीन 3 हजार ते 4 हजार रुपयांना विकावे लागतंय. महाविकास आघाडी आपल्या अन्नदात्याला त्यांचे हक्क, त्यांच्या कष्टाचे फळ आणि न्याय मिळवून देईल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलंय.

Rahul Gandhi: हे मोदी अन् भाजप सरकार नसून अदानी अन् अंबानी सरकार; राहुल गांधींचा घणाघात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सत्ताधारी आणि विरोधकांकडून यापूर्वीच जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. महाविकास आघाडीच्या पाच मोठ्या आश्वासनांबद्दल सांगायचे तर त्यात शेतकऱ्यांची समानता, मदत आणि समृद्धी, महालक्ष्मी योजना, कुटुंब संरक्षण आणि बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांची आर्थिक मदत या आश्वासनांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीच्या समानतेच्या आश्वासनामध्ये जातीची जनगणना आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे. त्याच वेळी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि समृद्धीसाठी दिलेल्या आश्वासनांमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतची कृषी कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम समाविष्ट आहे.

Rahul Gandhi : काँग्रेसला बसणार धक्का, 99 खासदार होणार अपात्र? याचिका दाखल

महालक्ष्मी योजनेबाबत, महाविकास आघाडीने महिलांना दरमहा 3 हजार रुपये आणि सत्तेत आल्यास महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कुटुंबाच्या संरक्षणाच्या आश्वासनामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 25 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याव्यतिरिक्त, रुग्णांना मोफत औषधे देखील मिळणार आहेत. शेवटचे वचन तरूणांसाठी असून महाराष्ट्रात एमव्हीएचे सरकार आल्यास राज्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

follow us