Download App

फाशीची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्याची पद्धत; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलं

राज्यात फाशी देण्याची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्यात पद्धत सुरु झाली असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय.

Vijay Wadettivar : राज्यात फाशी देण्याची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्यात पद्धत सुरु झाली असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) घेरलंय. दरम्यान, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde Encounter) पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. वडेट्टीवार मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्या व्यक्तीने वाईट कृत्य केला त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे याबद्दल दुमत नाही. बदलापूरमधील नराधमाला फाशी द्या, अशी आमची मागणी होते हे खरं आहे, पण 2 महिन्यांत आरोपीला फासावर लटकवू असं मुख्यमंत्री बोलले होते, आता फाशी देण्याची पद्धत चुकीली का गोळी मारून फाशी देण्याची पद्धत सुरु झाली असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Manoj Jarange : अखेर उपोषण स्थगित; मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, म्हणाले कोर्टाचा आदर करतो

तसेच ज्या पद्धतीने प्रेसनोटमध्ये उल्लेख केला की सोशल मीडियासमोर बुरखा घालून हातकडी घातलेला आरोपी पाहायला मिळाला. पोलिसांच्या हातातून आरोपीने बंदूक घेतली, असं सांगण्यात येत आहे पण आरोपीच्या हातात बेड्या नसतात तर एक बेडी पोलिसांना आणि दुसरी आरोपीला बांधलेली असते, तरीही आरोपीने बंदुक कशी घेतली? असा सवाल वडेट्टीवार यांनी केलायं.

तसेच आरोपीची भूमिका पिस्तूल वापरायची नव्हती. आरोपीने पोलिसांची बंदूक कशा पद्धतीने काढली हा मोठा प्रश्न असून अशी घटना तेलंगणामध्ये घडली होती. त्यावेळी 4 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी तो एन्काऊंटर केला होता, या प्रकरणाची आणि अक्षय शिंदेच्या प्रकरणाची पार्श्वभूमी सारखीच असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. जे आता मज्जा मारत आहेत ते सत्ताधारी आणि भाजप आरएसएसशी संबंधित आहेत. त्या आरोपीला संरक्षण देण्यासाठी हे सर्व केले गेलं असल्याचाही आरोप वडेट्टीवार यांनी केलायं.

सणासुदीच्या आधीच सोने चमकले! 76 हजारांचा टप्पाही केला पार; जाणून घ्या, सोन्याचे नवे दर

सरकारने आपटेला मोकळं का सोडला हा देखील प्रश्न आहे. आरोपी असलेले आपटे यांना सरकार पतीशी घालत का? या रॅकेटच्या मोर्चाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये मारले गेले अशी शंका आहे. महाराष्ट्र यूपी आणि बिहारच्या दिशेने चालला आहे असं वाटतं असल्याचीही टीका वडेट्टीवार यांनी केलीयं.

तर बृजभूषण सिंगचा एन्काऊंटर का नाही केला?
एक जाहिरात काय दर्शवते की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा एन्काऊंटर झाला का? असं दिसून येतंय. कोणी देवा भाऊला समर्थन केलंय कोणी शिंदेची तारीफ करून त्यांचं समर्थन केलंय. करायचं होतं तर बृजभूषण सिंगचा एन्काऊंटर का नाही केला? भाजप खासदारांनी किती लोकांचे छळ केले त्यांच्यावर कारवाई हा होत नाही
लोकांनी या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची, या प्रश्नांची सरबत्तीच वडेट्टीवार यांनी केलीयं.

follow us