Download App

राज ठाकरे वाघ पण कोल्हा करण्याचा प्रयत्न; भूमिका जाहीर करण्याआधीच काँग्रेस नेत्याचा टोला

Vijay Wadettiwar On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) वाघ माणूस पण त्याचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप राज ठाकरेंनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. या मेळाव्यात ठाकरेंकडून भूमिका घेणार जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावर बोलताना वडेट्टीवारांनी थेट भाष्य केलं आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घोषित; काँग्रेस 17, राष्ट्रवादी 10 शिवसेना 21 जागा लढणार

विजय वडेट्टीवार म्हणाले, दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असं नेहमीच राज ठाकरे सांगत होते, मात्र मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी दिल्लीवारी केली. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं. ते दिल्लीवारी करुन आले आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी पिंजऱ्यात अडकवण्याचं काम होतंय का अशी शंका सर्वांच्याच मनात आहे. ठाकरे हे वाघ आहेत पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न होत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj यांची महती सांगणारी आरती प्रदर्शित; आनंदी वास्तु प्रोडक्शनची निर्मिती

तसेच मुंबईतील आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडतील ती सत्ताधाऱ्यांविरोधात असेल अशी अनेक मराठी माणसांची अपेक्षा आहे. ते आज जे काही बोलतील सत्ताधाऱ्यांविरोधात असेल, दिल्लीसमोर ते झुकणार नाहीत असं वाटतं, असल्याचंही विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे.

Sharad Pawar : गडी थांबणारा नाही; वय काढणाऱ्यांविरोधात पवारांचा शड्डू; सांगितलं कधीपर्यंत काम करणार

मागील अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी राज ठाकरे यांनी राज्यातील काही मतदारसंघात दौरादेखील केला होता. त्यानंतर महायुतीसोबत युती होणार असल्याची शक्यता दिसून येत होतं. त्यासाठी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी मॅरेथॉन बैठक पार पडली.

दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची राज ठाकरेंनी भेट घेतली होती. मात्र, शिंदे -फडणवीसांसोबतची बैठक आणि शाह यांची भेट घेतलेली भेट निष्फळ ठरली. महायुतीसोबत न जाता ठाकरेंनी आत्तापर्यंत तटस्थ भूमिका घेतली. त्यानंतर आज जाहीर मेळाव्यात राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. त्याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us