मोठी बातमी! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घोषित; काँग्रेस 17, राष्ट्रवादी 10 शिवसेना 21 जागा लढणार

मोठी बातमी! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घोषित; काँग्रेस 17, राष्ट्रवादी 10 शिवसेना 21 जागा लढणार

Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले,  बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जागावाटपाची माहिती दिली.

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती , शिरूर, सातारा , भिवंडी ‘ माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर शिवसेना जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढणार आहे.

Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट! AlMIM देणार उमेदवार, फटका कोणाला?

काँग्रेस पक्ष नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई 17 जागा लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघावर प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. मात्र, या प्रश्नाचं उत्तर देणं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाळलं. यावेळी या नेत्यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.

राज्यात काही मतदारसंघात जागावाटपावरून तिढा निर्माण झाला होता.  यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली सांगली मतदारसंघाची. तसेच अन्य मतदारसंघांतही थोड्या फार प्रमाणात धुसफूस होतीच.  या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांसह उर्वरित जागांवर कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार देईल याचीही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

असे आहे महाविकास आघडीचे जागावाटप

काँग्रेस : १७ जागा
नंदुरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा
गडचिरोली
चंद्रपूर
नांदेड
जालना
मुंबई उत्तर मध्य
पुणे
लातूर
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
उत्तर मुंबई

उद्धव ठाकरे शिवसेना – २१

जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशिव
रत्नागिरी
बुलढाणा
हातकणगले
संभाजी नगर
सांगली
हिंगोली
यवतमाळ
वाशीम
उत्तर पाच्छिम मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
मुंबई दक्षिण
ईशान्य मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १०

बारामती
शिरूर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
नगर दक्षिण
बीड

follow us
  • fb
  • instagram
  • youtube