Download App

‘शरद पवार भाजपला पाठींबा देतील…’; कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Yashomati Thakur on sharad pawar : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केलं. येत्या 15 ते 20 दिवसांत चमत्कार दिसेल, तसेच राज्यात अन् केंद्रात शरद पवारांचा (Sharad Pawar) सहभाग असणारे मजबूत सरकार दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला. आमदार राणा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या 15 ते 20 दिवसांत शरद पवार भाजपला पाठिंबा देतील या रवी राणा यांच्या विधानामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राणा हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जातले आहेत. त्यामुळं त्यांच्या दाव्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राणा यांनी केलेल्या विधानाबाबत यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, अशी विधाणं करणारी वेडी माणसं आहेत. त्यांच्यावर मला कशाला प्रतिक्रिया द्यायला लावता? तुम्ही शरद पवारांबद्दल विचाराल तर ते नेहमीच एका विचाराबरोबर राहिलेले आहेत. पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले. मात्र, कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरही ते दुसऱ्या विचाराबरोबर गेले नाहीत.

पुढचे तीन दिवसही सुट्टी नाहीच; धो-धो पाऊस बरसणार; हवामान विभागाने सांगितलं… 

यशोमती ठाकूर म्हणाल्या, शरद पवार हे नेहमीच सर्वधर्म समभाव या विचारांबरोबर राहिले आहेत. आजवर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली नाही. आणि आताही ते भाजपला समर्थन देतील, असं मला तरी वाटत नाही. कुणी काहीही वायफळ बोलत राहायचं, आणि त्याच्यावर मग आम्ही प्रतिक्रिया द्यायच्या. याची काही गरज नाही, असंही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

राणा नेमकं काय म्हणाले?
देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी पीएम नरेंद्र मोदी यांना साथ देणे गरजेचे आहे. शरद पवार भाजपमध्ये गेल्यास केंद्रातील मोदी सरकार मजबूत होईल, असेही राणा म्हणाले होते.

राजकारणात काहीही होऊ शकते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्षनेते होते आणि उपमुख्यमंत्री झाले. मंत्री असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्यात कोणतीही अडचण दिसत नाही. येत्या १५ दिवसांत शरद पवार भाजपसोबत येतील, असं राणा म्हणाले.

Tags

follow us