पुढचे तीन दिवसही सुट्टी नाहीच; धो-धो पाऊस बरसणार; हवामान विभागाने सांगितलं…

पुढचे तीन दिवसही सुट्टी नाहीच; धो-धो पाऊस बरसणार; हवामान विभागाने सांगितलं…

Maharashtra Rain Updates : राज्यात आता सर्वदूर परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील तीन दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Ujjain Rape Case : तिने मदतीसाठी याचना करुनही मदत केली नाही; पोलिसांकडून पोक्सोंतर्गत गुन्हा…

अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र एका आठवड्याभरापासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरु असल्याची परिस्थिती आहे. मागील आठवड्यात नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थितीच होती. या पावसामुळे नागपुरातल्या नागरिकांना मोठा अर्थिक फटकाच बसल्याचं पाहायला मिळालं होतं.

Gautami Patil आली अन् नाचून गेली; पोलिसांनी दिला दणका…

गणेश विसर्जनासाठी काल पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक भागात वरुणराजाच्या आगमनाने उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं. वरुणराजा बरसत असतानाही गणेशभक्तांनी गणरायाला उत्साहाच्या वातावरणात निरोप दिला आहे. मुंबई, पुणे, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत पाऊस आल्याने नदी नाले ओढे तुडूंब भरुन वाहत असल्याचं पाहायला मिळालं होतं.

Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…

हवामान विभागाच्या अंदाजानूसार राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केलायं तर मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली सुनावणीची तारीख

आता कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, आधीच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नूकसानाला सामोरं जावं लागलं आहे. आताही हवामान विभागाकडून पाऊस बरसणार असल्याचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीमुळे त्रस्त असलेला शेतकरी हातातले पिक गेल्यामुळे आणखी अडचणीत सापडणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube