Download App

काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

  • Written By: Last Updated:

नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nagpur Session court) जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर प्रत्येकी साडेबारा लाखांचा दंडही ठोठाविला आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पूरकर यांनी हा निकाल दिला आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास सुरु झाला होता. आता या प्रकरणात बँकेने सुनील केदार, मुख्य रोखे दलाल केतन शेठ, बँकेचे तत्कालिन मॅनेजर अशोक चौधरी यांच्यासह आणखी तीन जणांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे.


Satyashodhak : फुले दाम्पत्याची संघर्षमय गाथा झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘सत्यशोधक’ चा ट्रेलर लॉन्च!

काय आहे प्रकरण?
1999 मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या दरम्यानच्या काळात बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले. पण या कंपन्यांकडून खरेदी केलेले शेअर्स प्राप्त झाले नाहीत किंवा ते बँकेच्या नावेही झाले नाहीत. कंपन्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही. कालांतराने या कंपन्या देखील दिवाळखोरीत निघाल्या.

याशिवाय सहकार विभागाच्या कायदानुसार परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. पण या नियमाचे देखील उल्लंघन करत रक्कम गुंतवली गेली होती, असा ठपका केदार यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व आरोपांनंतर फौजदारी गुन्ह्याची नोंद झाली होती. पुढेया प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. मात्र विविध कारणांनी खटला प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.

Tags

follow us