Harshvardhan Sapkal Compared Devendra Fadnavis With Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलं आहे. यासंदर्भात आता कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांची तुलना केली आहे. दोघंही एकसारखेच शासक असून त्यांचा कारभार देखील एकसारखाच आहे, अशी टीका केलीय.
औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे. औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं होतं. स्वत:चा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा (Maharashtra Politics) होता, सेक्युलर विचारांचा होता. त्याचा खून केला, नुसता खूनच केला नाही तर दाराशिकाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीत फिरवलं. स्वत:च्या लहान भावाला पागल करार दिला. त्याच्यावर विषप्रयोग केला, त्याला मारून टाकलं.
मोठी बातमी! खुलताबादमध्ये पोलीस प्रशासन हायअलर्टवर, औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास…
इतकंच नाही तर सदा कदा औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही. हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर शासक आहेत. सदा कदा धर्माचा आधार घेतात. मात्र संतोष देशमुख सारखे हत्या प्रकरणं, गरिबांच्या लेकीबाळी आज सुरक्षित नाही. दुर्देवाने महाराष्ट्रात हा प्रकार आज देवेंद्र फडणवीस सरकारचा आहे. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.
औरंगजेबाच्या कबरीवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मावळे आणि अठरापगड समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला आव्हान दिलं. अफगानिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते, तो एक क्रूर शासक होता. मात्र मराठी माणूस औरंगजेबाला कधीही घाबरला नाही. शिवाजी महाराजांचं शौर्य आम्हाला प्रमाण आहे. या शौर्याचं प्रमाण अन् औरंगजेबाला कसं गाडलं याचा इतिहास आहे. तेच या कबरीच्या मातीत, महाराष्ट्राच्या मातीत आहे.
एक दिवस शिवरायांच्या किल्ल्यांसाठी; शिवजयंती निमित्त निलेश लंकेंची मोहीम
जेव्हा औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगतात. याचा अर्थ काय तर त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी चिन्हीत होतं. दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती. तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची कबर उखडून फेका, असं दर्शवते. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असं देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.