मुंबई : काँग्रेस पक्षातील एका नेत्यांबाबत एक अत्यंत महत्वाची व मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. देशमुख यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात केलेल्या एका वक्तव्यावरून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जर असे झाले तर देशमुख हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस शिस्त पालन समितीची बैठक होणार आहे. बैठकीत आशिष देशमुख यांनी केलेली वक्तव्य, त्यांची पक्षाविरोधात भूमिका याबाबत होणार चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पक्ष विरोधी कारवायावरून देशमुख यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना
पक्षाकडून हकालपट्टी झाली तर देशमुख हे राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशा शक्यता वर्तवली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच देशमुख यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
पक्ष विरोधी कारवाया भोवणार
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. असे वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले होते. सातत्याने पक्षविरोधी विधाने करणाऱ्या देशमुखांची वरिष्ठ नेते योग्य ती दखल घेतील, असे देखील लोंढे यांनी सांगितले होते. यातच आता पक्षाकडून देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.