Harshvardhan Sapkal : छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्साहात साजरी केली जातेय. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना मोठी चुक केली. राहुल गांधींनी शुभेच्छा देताना छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाला असून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. यावर कॉंग्रेसने (Congress) जोरदार प्रत्युत्तर दिलं. ध चा मा करून भाजप घाणेरडे राजकारण करतेय, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली.
अंजलीताई GR काढण्याची प्रक्रिया समजून घ्या, अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करू नका, धनंजय मुंडेंचा टोला
तसेच मालवणमध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळल्याने कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. याबद्दल भाजप कधी माफी मागणार, असा सवालही कॉंग्रेसने केलाय.
भाजपकडून माफीची मागणी…
राहुल गांधी महाराष्ट्रातील जनतेचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करत आहेत. जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली वाहतात.हा एक गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला. तर औरंग्याच्या पिलावळाकडून काय अपेक्षा करणार, हे हिरवे साप आहेत. राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा त्यांना फिरकूही देणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
दरम्यान, आता कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्येही मोदींनी श्रद्धांजली असंच लिहिलेलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकारण करू नये, असं लोंढे म्हणाले.
दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता की परवेश वर्मा, RSS अन् भाजप नेतृत्व कुणाला देणार पसंती ?
पुढं ते म्हणाले, मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. भाजपाच्या सरकारनेच हा पुतळा उभारला आणि अवघ्या आठ महिन्यांत तो कोसळला. त्यामुळं महाराजांचा अवमान झाला. कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या पण अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी जलपूजन केले, परंतु या स्मारकाची एक वीटही रचलेलीली नाही, त्याबद्दल भाजप कधी माफी मागणार, असा सवाल लोंढे यांनी केला आहे.
अनेक भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही महाराजांचा अपमान केला होता, परंतु भाजपच्या नेत्यांना त्याबद्दल जराही शरम वाटत नाही. भाजप केवळ राजकीय स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतेय, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो, असं लोंढे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केली. राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटलं, तर माय हंबल ट्रिब्युट. म्हणजे, मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे. आता ध चा मा करून सत्ताधाऱ्यांनी घाणेरडे राजकारण करू नये, असं सपकाळ म्हणाले.