‘चार्जशीटमध्ये फेरफार…’, बीड हत्याप्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मोठे रान पेटवले होते. मात्र, धस यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याने सातत्याने सुरेश धस यांच्यावर गंभीर होत आहेत. दरम्यान, मुंडे-धस भेटीवरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वेगळीच शंका व्यक्त केली.
बाप-लेकाची जोडी करणार धमाल, प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र
आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील गुप्त बैठकीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे, असा संशय जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांची भेट घेण्यापूर्वी सुरेश धस यांनी भाजपकडून येणाऱ्या दबावाबाबत सांगायल हवं होतं. तसं केलं असतं तर धस यांना मराठा समाजाने डोक्यावर घेतलं असतं. पुढच्या निवडणुकीत मराठ्यांनी सुरेश धस यांना १ लाख ६७ हजार मतांनी विजयी केले असते. मात्र, धस यांनी परस्पर मुंडेंची भेट घेतल्याने मराठा समाजाचा त्यांच्यावरील विश्वास उडाला, असं जरांगे म्हणाले. सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील गुप्त बैठकीनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे, असा संशयही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
सुरक्षित आणि समृद्ध शिर्डीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहू ; डॉ. सुजय विखे पाटील
मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारने रणनीती आखल्याचा आरोप आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. देवेंद्र फडणवीसांची दोन मंत्र्यांशी आंदोलनाबाबत चर्चा झाली आहे. दोन मंत्री अगोदर आरक्षणासाठी अन्नत्याग करणार, त्यानंतर आरक्षण उभे राहिल. आरक्षण आंदोलनासाठी ज्या मंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनीच ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट जरांगेंनी केला.
संजय राऊत काय म्हणाले?
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीत काहीतरी मोठी डील झाल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सुरेस धस ज्या वेगाने पुढे गेले किंवा ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागदपत्रे आणि पुरावे सादर केले, त्या सगळ्याला अचानक ब्रेक लागला. हे डील झाल्याशिवाय झालं नसेल. धस हे त्यांच्याच बॉसच्या ट्रॅपमध्ये अडकले, असंही राऊत म्हणाले.