चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Chandrapur Post) केल्याबद्दल भाजप नेत्यावर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी वेश्या व्यवसायाला सरकारने मान्यता देऊन हा व्यवसाय अधिकृत करावा, असे वक्तव्य केले होते. यावर भाजपमधील एका मोठ्या नेत्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे समोर आले. याप्रकरणी संबंधित नेत्यावर पोलिसांनी कारवाई केली.
अमृता फडणवीस यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अश्लील पोस्ट करणाऱ्या भाजप नेत्याला पोलिसांनी चंद्रपूरातून हद्दपारीची कारवाई केली आहे. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे घडला आहे. खेमचंद गरपल्लिवार असे कारवाई करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. त्यांनी व त्यांच्या पत्नीने काही महिन्याअगोदरच सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
खेमचंद गरपल्लिवार यांनी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी गरपल्लिवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गरपल्लिवार यांच्यावर याअगोदर अनेक गुन्हे दाखल होते. यामुळे गोंडपिपरी पोलिसांनी गरपल्लिवार यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ ( १ ) ( अ ) ( ब ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव उपविभागिय अधिकारी गोंडपिपरी यांचेकडे पाठविला असता याला मंजुरी देण्यात आली.