Download App

राहुल गांधींना हवे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व पुस्तक’, न्यायालयात अर्ज

Court Relief To Rahul Gandhi In Swatantryavir Savarkar Case : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अपमान प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायने हा खटला तहकूब केल्याचं समोर आलंय. पुणे येथील प्रथमवर्ग एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींविरोधात (Swatantryavir Savarkar Case) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची मानहाणी केली म्हणून बदनामीचा खटला चालू आहे.

फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी खटला दाखल करताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहलेले ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक तसेच एक पेन ड्राईव्ह आणि काही वर्तमानपत्रांची कात्रणं न्यायालयात दाखल केलेली आहेत. त्या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला मिळालेल्या नाहीत. ते सर्व कागदपत्रं आणि माझी जन्मठेप हे पुस्तक बचाव पक्षाला देण्याचे आदेश न्यायालयाने करावेत, असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलींद दत्तात्रय पवार यांनी मागील सुनावणीत दाखल केला होता.

सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार होणार प्रदान

त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्र, पेन ड्राईव्ह आणि ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक बचाव पक्षाला म्हणजेच राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांना द्यावेत असा आदेश न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी दिला होता. आज झालेल्या सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोलाटकर यांनी वरिल सर्व कागदपत्र, माझी जन्मठेप हे पुस्तक पुणे न्यायालयात अ‍ॅड मिलिंद द.पवार यांना हस्तांतरित केले.

सर्व दिलेल्या कागदपत्रांची सत्यता आणि पडताळणी केल्याशिवाय खटला पुढे जाऊ शकणार नाही. कारण सर्व कागदपत्रं अन् पुस्तकं वाचल्यानंतर त्यातली सत्यता स्षष्ट झाल्यानंतर खटल्याची सुनावणी नियमित घेता येईल. या सर्व कागदपत्रांची पडताळणी, सत्यता, कागदपत्रांचा अभ्यास याला ठराविक कालावधी लागणार आहे. तोपर्यंत खटल्याची सुनावणी तहकूब करण्यात यावी असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केला.

“जर पुन्हा असे बेजबाबदार वक्तव्य केले तर..” सावरकर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

तसेच फिर्यादीत नमूद केल्या प्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे मोठे लेखक होते. त्यांनी हिंदूत्वाचा प्रथम मुद्दा मांडून हिंदुत्वाचा प्रचार केला. 1937 मध्ये विनायक दामोदर सावरकर हे हिंदु महासभेचे अध्यक्ष होते. अध्यक्षपदी असताना अहमदाबाद येथील महासभेत सर्वात प्रथम ‘टू नेशन थेअरी’ विनायक दामोदर सावरकर यांनी मांडली होती. हा सर्व उल्लेख त्यांचा लिखाणात उपलब्ध आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 साली हिंदुत्व नावाने पुस्तक लिहिले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फिर्यादी यांचे नात्याने आजोबा होते. म्हणून हिंदुत्व या पुस्तकाची प्रत फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी बचाव पक्षाला देण्याची विनंती अ‍ॅड मिलिंद पवार यांनी अर्जाद्वारे केली आहे. अ‍ॅड मिलिंद द. पवार यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. खटल्याची सुनावणी तहकूब करून पुढील दिनांक 9 मे 2025 या तारखेस सुनावणी होणार आहे.

 

follow us