‘शिवतीर्थावरच मेळावा घेऊ शकलो असतो पण..,’; CM शिंदेंनी सांगितलं खरं कारण

Cm Eknath Shinde : यंदाच्या वर्षीचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ शकलो असतो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यंदाही काहीशा प्रमाणात हा संघर्ष दिसून आला अखेर ठाकरे गटाला मेळावा शिवतीर्थावर आणि शिंदे गटाचा […]

Cm Eknath Shinde

Cm Eknath Shinde

Cm Eknath Shinde : यंदाच्या वर्षीचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ शकलो असतो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यंदाही काहीशा प्रमाणात हा संघर्ष दिसून आला अखेर ठाकरे गटाला मेळावा शिवतीर्थावर आणि शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला आहे. मेळाव्याच्या संघर्षावरुन एकनाथ शिंदे यांनी खरं कारण सांगितलं आहे.

आमच्याकडे बसलेत तीन हिरो, कमळा पसंतवाले; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जिथे बाळासाहेबांचे विचार तिथेचं आमचं शिवतीर्थ आहे. मी दसरा मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही केला. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआमपणे मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

तसेच बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर गेऊन नाचत आहात. बाळासाहेबांनी ज्यांना, ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करीत आहात. बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत आहात, हे कटू सत्य असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

MP Election 2023 : मिर्ची बाबांनी काँग्रेस सोडली, समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार

आम्ही सत्तेवर लाथ मारली, सत्तेची खुर्ची सोडली पण बाळासाहेबांचा विचार सोडला नाही. कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचारी हे दुर्देव आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार तिथेचं आमचं शिवतीर्थ आहे. मी दसरा मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही केला. जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआमपणे मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Sharad Pawar यांचा म्हाडा दौरा ‘या’ कारणामुळे रद्द, मात्र अजितदादा 50 मिनिटं आधीच लावणार हजेरी

ज्या काँग्रसेच बाळासाहेबांनी वाभाडे काढले आज त्यांचेच गोडवे गायले जात आहेत. मनिशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारले. आज त्याचं काँग्रेसचे जोडे हे लोकं उचलतात. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझ दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचे शब्द होते, असंही ते म्हणाले आहेत.

ज्या शिवतीर्थावरुन गर्व से कहो हम हिंदू है…चा नारा दिला तिथेच आज गर्व से कहो हम समाजवादी ,काँग्रेसी, हिंदुत्व विरोधी है… असा नारा देिला जात आहे. तुम्ही बाळाासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिलीयं. हिंदुत्वाशी बेईमानी तुम्ही केली, काँग्रेस एमआयएम कोणा कोणाला डोक्यावर खाद्यांवर घेतलं, उद्या हमास, दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेशी गळाभेट घेतील, अशीही खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Exit mobile version