Sharad Pawar यांचा म्हाडा दौरा ‘या’ कारणामुळे रद्द, मात्र अजितदादा 50 मिनिटं आधीच लावणार हजेरी

Sharad Pawar यांचा म्हाडा दौरा ‘या’ कारणामुळे रद्द, मात्र अजितदादा 50 मिनिटं आधीच लावणार हजेरी

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झाला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण हा दौरा विशेष होता.

Shraddha Kapoor Post: ह्रतिक रोशनच्या ‘क्रिश4’ मध्ये झळकणार श्रद्धा कपूर?

यावेळी शरद पवार सोलापूरातील कापसेवाडी येथे शेतकऱ्यांचा एक मेळावा घेणार होते. तर त्यानंतर ते पंढरपूरला देखील जाणार होते. या मेळाव्याला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहणार होते. मात्र अचानक पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.

यामुळे रद्द झाला पवारांचा दौरा…

शरद पवारांचा दौरा रद्द का झाला? याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पण बहुधा इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे त्यांचा हा दौरा रद्द झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. शरद पवार असो किंवा अजित पवार असो आजचा त्या दोघांचाही दौरा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये राजकीय गोळाबेरीज किंवा वजाबाकी यांचं गणित ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

Radhakrushn Vikhe : ‘या’ नेत्यांच्या दुर्लक्षपणामुळे मराठा आरक्षण… मंत्री विखेंचा खळबळजनक आरोप

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोलापूरातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळेच शरद पवारांचा सोलापूर दौरा खास होता. कारण अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार हे अशा प्रकारे एकाच ठिकाणा दौऱ्यासाठी गेलेले आहेत.

अजित पवार हे त्यांच्या गटातील आमदार बबन शिंदे यांच्या कारखान्याच्या कार्याक्रमाला हजर राहणार आहेत. तर अजित पवार हे या कार्यक्रमाला ठरलेल्या वेळेपेक्षा 50 मिनिट अधिच पिंपळनेमध्ये पोहचणार आहेत. दरम्यान त्यांच्या या दौऱ्याला सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विरोध दर्शवला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube