…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

…नाहीतर लोक म्हणतील तुम्हीही दगाफटका केला; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Manoj Jarange On CM Eknath Shinde : मराठा आरक्षण (Maratha reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आज (दि.24) संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांना इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण अभ्यासाला तेलंगणा निवडणुकीचा फटका; अधिकाऱ्यांमुळे कागदपत्र तपासणीत अडचण

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करुन आपली प्रतिमा खरी करुन दाखवावी. अन्यथा त्यांनीही मराठा समाजाबरोबर दगाफटका केल्याचा संदेश जाईल, असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

मराठा आरक्षण अभ्यासाला तेलंगणा निवडणुकीचा फटका; अधिकाऱ्यांमुळे कागदपत्र तपासणीत अडचण

मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकारकडे सायंकाळपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आम्ही सरकारला सायंकाळपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने दिलेल्या मुदतीमध्येच आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा. त्यानंतर सरकारने आमच्या दारात आरक्षण घेऊनच यायचं नाहीतर त्यांनी आमच्या दारात येऊच नये, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आल्याची माहिती आहे, पण सरकार जर आरक्षण देणार असेल तरच त्यांच्याशी चर्चा करु, अन्यथा चर्चा करणार नसल्याचेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारला यापुढे एका तासाचा देखील वेळ दिला जाणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

जरांगे पाटील म्हणाले की, आज मराठा समाज वेदना भोगत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी आपला शब्द खरा करुन दाखवावा. त्यांनी स्वतःची प्रतिमा खराब करुन घेऊ नये. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदापेक्षा मराठा समाजातील लोकांच्या वेदनांना महत्व द्यावं.

मराठा समाजाला सायंकाळपर्यंत आरक्षण द्यावे, असे जर केले नाही तर मुख्यमंत्री शिंदेंबद्दल गैरसमज पसरेल. मराठ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील दगाफटका केल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेची होईल, असेही यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube