Download App

कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच

Ajit Pawar on Manikrao Kokate  : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य आणि रमीच्या व्हिडिओने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार  यांची कोंडी झाली आहे. रमी खेळणाऱ्या कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडींनंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येत्या सोमवारी माणिकराव कोकाटेंबरोबर समोरासमोर चर्चा करुन निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणाले, मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आत घडलेलं आहे. विधिमंडळाचा परिसर हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारित येतो. या प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडूनही सुरू आहे अशी माझी माहिती आहे. माझी अजून माणिकराव कोकाटेंशी भेट झालेली नाही. आता बहुतेक सोमवारी भेट होईल. प्रत्येकावर जबाबदारी आहे तेव्हा आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे अशी सक्त सूचनी मु्ख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मी सुद्धा माझ्या लोकांना याची माहिती दिली होती.

स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या, माणिकराव दिलखुलास पण.. विखेंचा कोकाटेंना सल्ला अन् रोहित पवारांना टोला

याआधीही कोकाटेंकडून असेच काहीतरी घडले होते तेव्हा मी दखल घेतली होती आणि त्यांना पुन्हा असे काही घडू नये असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. दुसऱ्यांदा घडलं तेव्हा सुद्धा मी त्यांना जाणीव करुन दिली होती. इजा बिजा झाली आता तिजाची वेळ आणू नका असे मी त्यांना सांगितले होते. या प्रकरणात कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी रमी गेम खेळत नव्हतो अशी माहिती दिली होती. आता यात नेमकं काय घडलं याचं उत्तर चौकशीतून मिळेलच असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला.

कोकाटेंचा निर्णय सोमवारी होणार?

आता सोमवारी किंवा मंगळवारी त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहे यानंतर मी काय तो निर्णय घेणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. यात जर काही तथ्य आढळलं तर तुम्ही काय कारवाई करणार या प्रश्नावर उत्तर देताना हा निर्णय मुख्यमंत्री आणि आमच्या अखत्यारित आहे त्यानुसार काय तो निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

माणिकराव कोकाटेंची खुर्ची जाणार? पडद्यामागे हालचाली अन् विचार सुरू; नवा कृषिमंत्री कोण..

माणिकराव कोकाटे खोटे बोलतात असे रोहित पवार म्हणाले (Rohit Pawar) आहेत यावर बाकी कोण काय बोलतंय याचं मला काही देणंघेणं नाही. महायुतीत असताना सरकारला अडचण होईल असं वक्तव्य कुणाकडूनच होऊ नये असे अजित पवार यांनी सांगितले.

follow us