Ajit Pawar On Sharad pawar : पिढीला जन्म देणारी सून बाहेरुची कशी? असा सवाल करीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) टोला लगावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असा उल्लेख सुनेत्रा पवारांचा केला होता. त्यावर बोलताना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर सडतोडपणे भाष्य केलं आहे.
Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
अजित पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा हा निर्णय माझा नसून पक्षाचा आहे. सुनेत्रा पवार यांना सध्या महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीची ही लढत सरळ-सरळ होणार असून ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. देशातल्या इतर जशा निवडणुका होतात तशीच बारामतीची निवडणूक होत आहे. बारामतीतून आम्ही सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे, विरोधक टीका करतात तर आपल्या पिढीला जन्म देणारी सून ही बाहेरची कशी होते? असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
मागील 35 वर्षांपासून मी निवडणूक लढवत आहे. माझ्या मतदारसंघातून मला प्रचंड मताने लोकांनी निवडून दिलं आहे. ही निवडणूक आता मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे. आम्ही जी भूमिका घेतली ती मोदींनी पंतप्रधान पद खंबीरपणे सांभाळलं, नावलौकिक केलं, सर्वच घटकाला न्याय दिला म्हणूनच. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं ही सर्वांची इच्छा आहे . त्यांना पंतप्रधान करायचं असेल तर त्यांच्या विचारांचे खासदार निवडून गेले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आहे. महाविकास आघाडीतही सर्वच पक्ष होते, शिवसेना चालते मग भाजप का नको? 2014 ला निकालाआधीच शरद पवार यांनी बाहेरुन भाजपला पाठिंबा होता. त्यावेळी इतरांनी केलं की स्ट्रटेजी आम्ही केलं तर वेगळं असं आहे. मी सरळ मार्गाने जातो रणनीती मला जमत नाही. मी शब्दाचा पक्का आहे. राष्ट्रवादी पक्षाचं बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे पुढील काळात काहीही होऊ शकतं. पुढील चार ते पाच वर्षांत कळेच राष्ट्रवादीशी सुत्र कोणाकडे? असंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता. त्यानंतर अनेकदा भाषणामध्ये अजित पवार यांनी शरद पवारांना सासूचे दिवस आता संपलेत आता सुनेचे दिवस आले असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं.