Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत (Mahajyoti Skill Development Training Scheme)प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना रोजगाराच्या(Employment) विविध संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच स्वतःचा उद्योग (Industry)सुरु करण्यासाठी बँक तसेच वित्त संस्थांमार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करु शकतात. राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करु शकतील, जेणेकरून त्यांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज लागणार नाही.

तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, शाहांचा पवारांवर निशाणा

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
– अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
– राज्यातील इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील युवक/युवती महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?

योजनेचा लाभ काय मिळणार?
– राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील युवक युवतींना निवासी आणि अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
– या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
– राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
– राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
– या योजनेच्या सहाय्याने राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील व राज्याचा औद्योगिक विकास होईल.
– राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
– या योजनेच्या सहाय्याने राज्यात नवीन उद्योग सुरु होतील जेणेकरून राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील जेणेकरून त्यांना रोजगाराच्या शोधात आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व युवक/युवतींचे होणारे स्थलांतरण थांबेल.
– नागरिकांना उद्योग क्षेत्राशी निगडित कौशल्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
– राज्यातील युवक/युवती स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण करून एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचा तसेच स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील व स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
– राज्यातील नागरिकांचे भविष्य उज्वल बनेल.
– राज्यातील नागरिकांचा सामाजिक स्तर उंचावेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी व शर्थी
– फक्त महाराष्ट्र राज्यातील युवक/युवतींनाच महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ दिला जाईल.
– महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– अर्जदार व्यक्ती ही इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातील असणे आवश्यक आहे.
– खुल्या वर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
– अर्जदार व्यक्ती ही नॉन क्रिमीलेअर गटातील असणे आवश्यक.
– अर्जदाराकडे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट असणे आवश्यक.
– अर्जदाराने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
– अर्जदार व्यक्तीची राज्यात कोणत्याही ठिकाणी रोजगार करण्याची तीव्र इच्छा असावी.
– अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असावे.
– 18 वर्षाखालील तसेच 45 वर्षाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
– अर्जदाराने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या एखाद्या योजनेंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्यास अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– अर्जदार व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक.
– अर्जदाराला मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक.
– मुदतीनंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
– अर्जदार व्यक्तीला एकावेळी फक्त एकाच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ दिला जाईल.
– योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रशिक्षण शुल्क, भोजन शुल्क, निवास शुल्क अदा केला जातो, त्याशिवाय कोणताही खर्च अनुज्ञेय असणार नाही.
– प्रशिक्षणाच्या वेळी लाभार्थ्याला रोजगार भत्ता दिला जाणार नाही.
– प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांची किमान 80 टक्के हजेरी आवश्यक असेल.
– योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच अंतिम निवड करण्यात येईल, निवडीबाबतचे अंतिम अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूर यांना राहील.
– प्रशिक्षणार्थी शिस्तभंग/गैरवर्तणूक करत असल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– रेशन कार्ड
– रहिवाशी दाखला
– मोबाईल नंबर
– ई-मेल आयडी
– पासपोर्ट आकाराचे फोटो
– जातीचा दाखला
– जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला
– बँक खात्याचा तपशील.
– नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट

पत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
एमए / 15/1, एस अंबाझरी आरडी,
वसंत नगर, नागपूर,
महाराष्ट्र 440020

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube