काय सांगता! इंग्रजी येईना म्हणून नोकरीही मिळेना; नीती आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासा..
![काय सांगता! इंग्रजी येईना म्हणून नोकरीही मिळेना; नीती आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासा.. काय सांगता! इंग्रजी येईना म्हणून नोकरीही मिळेना; नीती आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासा..](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/niti-aayog-_V_jpg--1280x720-4g.webp)
NITI Aayog Report : जगातील अनेक देशांत इंग्लिश ही संवादाची भाषा आहे. तसेच इंग्रजीला जागतिक भाषा म्हणून स्वीकारले गेले आहे. याच कारणामुळे भारतात इंग्रजी भाषेची क्रेझ जास्तच दिसून येते. शहरांपासून गावांपर्यंत मुले सरकारी शाळांऐवजी खासगी शाळांत शिकण्यास प्राधान्य देत आहेत. कारण खासगी शाळांत इंग्रजी भाषेवर जास्त फोकस दिला जातो. देशात अनेक लोक असे आहेत ज्यांना वाटते की इंग्रजी भाषा येत नसल्याने चांगला रोजगार मिळाला नाही किंवा मिळत नाही. आता याच बाबतीत निती आयोगाचा एक (Niti Aayog Report) अहवाल समोर आला आहे. यामध्ये म्हटले आहे की इंग्रजी कमकुवत असल्याने पदवीधर युवकांना नोकरी मिळत नाही. या अहवालात भारतीयांच्या व्यथेवर बोट ठेवण्यात आले आहे.
या अहवालानुसार राज्यांतील विद्यापीठांतून पदवीधर युवकांच्या रोजगाराला प्रभावित करणारा महत्त्वाचा घटक इंग्रजीचा कमकुवतपणा हा आहे. त्यामुळे या संस्थांनी आता इंग्रजी आणि परदेशी भाषा प्रॉफीसीएनसी प्रोग्राम लागू करण्याची शिफारस केली आहे. यासाठी जागतिक भाषा संघटनांचे सहकार्य घेण्याचाही सू देण्यात आला आहे. निती आयोगाचा हा रिपोर्ट 10 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता.
निती आयोगाच्या शिफारसी काय
निती आयोगाच्या या अहवालात आणखीही काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. देशात जितके विद्यार्थी हायर स्टडीज करत आहेत त्यातील 80 टक्के विद्यार्थी सार्वजनिक विद्यापीठांत शिक्षण घेतात. यासाठी राष्ट्रीय शिक्षा निती 2020 च्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्रात 3 लाख रोजगाराच्या संधी, CM फडणवीसांनी केला रिलायन्ससोबत 3 लाख कोटींचा करार
इंग्रजी रोजगारातील मोठी समस्या
स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीना भेडसावणाऱ्या अनेक समस्या काय आहेत याचा उहापोह करण्यात आला आहे. काही राज्यांतील स्थानिक कारखान्यात बाहेरच्या राज्यांतूनच कमरण्यासाठी परप्रांतीय येत असतात. स्थानिक युवकांकडे टॅलेंट आहे मात्र इंग्रजी भाषेत त्यांना मात स्वीकारावी लागते. यामुळे त्यांना चांगला रोजगार काही मिळू शकत नाही.
एम्प्लॉयमेंट स्किलमध्ये वाढीची गरज
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या एम्प्लॉयमेंट स्किलमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांचा प्रॉफिशियन्सी प्रोग्राम सुरू करण्याची शिफारस केली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय भाषा संघटनांचे सहकार्य घेण्यासही सांगितले आहे.
रोजगारात भारताचा डंका, अमेरिकेनंतर दुसरा; कौशल्य विकासाचीही गरज, काय सांगतोय अहवाल?
रोजगारात भारताचा डंका
क्यूएस फ्यूचर इंडेक्स 2025 मध्ये (QS Skills Index) भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ग्रीन स्किल्ससह भविष्यातील रोजगार सज्जतेच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला आहे. परंतु, आर्थिक बदलांच्या बाबतीत भारत थेट 40 व्या क्रमांकावर आहे. तसेच भविष्यातील रोजगारांसाठी इच्छित कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्देशांकात 37 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारतात रोजगार उत्पन्न करण्याची क्षमता भविष्यातही राहणार आहे. परंतु, यासाठी आवश्यक आर्थिक बदल, कर्मचाऱ्यांतील कौशल्ये, वातावरण या महत्वाच्या घटकांवर भारताला मोठं काम करावं लागणार आहे.