तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, शाहांचा पवारांवर निशाणा
Amit Shah on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, असं म्हणत शाहांनी पवारांवर निशाणा साधला. २०१९ नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्यानं शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली. यावरून शाह यांनी पवारांना लक्ष्य केलं.
आमिर खान कोणत्याही अवॉर्ड शोमध्ये का जात नाही? कपिलच्या शोमध्ये केला खुलासा
शाह यांची अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना शाह म्हणाले, तुम्ही 10 वर्षे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? तुम्ही सिंचनाची सुविधा उपलब्ध देऊ शकले नाहीत. त्यामुळं विदर्भातील शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागा, असं शाह म्हणाले.
विरोधकांनी रामचंद्राचा अपमान केला
अमरावतीच्या अंबादेवी एकवीरा देवीला वंदन करून अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केली. नवनीत राणा यांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जातं. हे मत देशाला दहशतवाद आणि नक्षलवादापासून देशाला मुक्त करेल. काँग्रेसने राम मंदिर 70 वर्षे लटकवून ठेवलं. राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरेंना बोलावलं होतं, पवार, राहुल गांधींना बोलावलं होतं पण ते आले नाहीत. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्राचा अपमान केल्याची टीका शाह यांनी केली.
अमरावतीत हत्या झाल्या तेव्हा सो कॉल्ड हिंदू हित रक्षण उद्धव ठाकरे यांनी काहीही केले नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या सर्व संस्कार सोडले, आमचे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे संस्कार घेऊन पुढे जात आहेत, असंही शाह म्हणाले.
शाह म्हणाले, भाजपला 400 जागा मिळवून संविधान बदलायचं, असा खोटा अपप्रचारा कॉंग्रेस करतेय. आम्हाला हे करायचे असते तर 2014 पासून आमचं पूर्ण बहुमत आहे, तेव्हाच केलं असतं. मात्र आम्ही तसं केलं नाही. आम्ही संविधान बदलणार नाही, आणि कुणाचं आरक्षणणही काढणार नाही. बहुमताचा वापर 370 हटवण्यासाठी, तिहेरी तलावर बंदी घालण्यासाठी केला, असं शाह म्हणाले.