Udhav Thackeray : पक्षाच्या राजकीय हितासाठी गृहमंत्री त्याचे अधिकार वापरतोयं, अशा गृहमंत्र्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्यामुळे गृहमंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केलीयं. दरम्यान, माध्यमांशी गप्पा मारत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सामिल होण्याबाबतच्या नाट्यमय घडामोडींबाबत भाष्य केलं. यावेळी बोलताना अजितदादांनी वेशांतर करुन केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं. त्यावरुन आता विरोधकांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे.
प्रसिद्धी मोहिम! ठाकरेंनीही 700 कोटी खर्च केले, विरोधकांच्या टीकेवर बावनकुळे कडाडले…
उद्धव ठाकरे म्हणाले, देशात राष्ट्रीय सुरक्षेचं प्रकरण गंभीर असून अजित पवारांकडून गंमती जमतीतून बाहेर निघालेली गोष्ट ही भयानक असून आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे हे यावरुन सिद्ध होत आहे. सत्ताधारी सर्वसामान्य माणसांना छळतंय पण दुसरीकडे राज्याचा तत्कालीन विरोधी पक्षनेता वेशांतर करुन एअरपोर्टवरील यंत्रणांना चकवा देऊन गृहमंत्र्यांची भेट घेत आहे, हे गृहमंत्र्यांना मान्य आहे का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना केलायं.
‘इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत’ भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा
तसेच एअरपोर्टच्या सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एक जण असा येत आहे. त्यामुळे असा गृहमंत्री पदावर राहता कामा नये, अशा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीच उद्धव ठाकरे यांनी केलीयं. अजितदादांच्या वेशांतर प्रकरणावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य करीत विविध मागण्या केल्या आहेत. सुळे म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा थेट सवाल सुप्रिया सुळे यांनी केलायं.