उद्धव ठाकरेंवरील रागापोटीच मोदी सरकार राज्याला निधी देत नाही; शिवसेना नेत्याचा आरोप
Bhaskar Jadhav : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आणि कोणाच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार? याचा पेच निर्माण झाला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणूका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील, असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला. तसेच उद्धव साहेबांवर असलेला राग मोदी सरकार हा महाराष्ट्रातील जनतेवर काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Paris Olympics 2024 : मनू भाकरने केली कमाल, भारताला मिळणार ‘या’ इव्हेंटमध्ये पहिलं पदक
भास्कर जाधव यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव साहेबांवर असलेला राग मोदी सरकार हा महाराष्ट्रातील जनतेवर काढत आहेत, त्यामुळं महाराष्ट्राला केंद्राकडून विकास निधी मिळत नाही. केंद्र सरकार जे पैसे वाटत आहे, ते स्वत:च्या फंडातून देत नाही. तर ते देशातील नागरिकांच्या टॅक्समधून देते. बिहार, आंध्र प्रदेशला स्वतंत्र पॅकेज दिलं जात आहे. महाराष्ट्राने तुमचा अहंकार मातीमोल केला, तुमचं गर्वहरण केलं. अब की बर 400 पार म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी अब की बार तडीपार केल्याने तुम्ही महाराट्राला पैसे दणार नाही का? असा सवाल जाधव यांनी केला.
ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवणार
आगामी विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील आणि त्यांच्याच नेतृत्वाखालील सरकार राज्यात आणू, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. तशीच जनतेची सुध्दा इच्छा असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हेच आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा अपमान केला. नीती आयोगाच्या बैठकीत खूप काही मिळणार, अशा बातम्या पेरल्या. मात्र, राज्याच्या वाट्यलाला काहीही आलं नसल्याचं ते म्हणाले.
गृहमंत्र्यांची भाषा न शोभणारी…
गृहमंत्री फडणवीस पक्षातील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी ठोकून काढा असं म्हणतात. अजित पवार फक्त आपल्या आमदारांनाच पैसे देतात, हा पायंडा पडला आहे. त्यांचं राज्याकडे लक्ष नाही. तर दुसऱ्याचे सरकार आणि आमदार फोडायेच यावर त्यांचं लक्ष आहे. गृहमंत्री ठोकून काढायची भाषा करतात, हे गृहमंत्री राज्याला लांच्छनास्पद आहेत, अशा शब्दात जाधवांनी फडणवीसांवर टीका केली.