Ajit Pawar News : दोन वर्षांपू्र्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात सोडत भाजपसोबत युती केली. अजितदादांसोबत 40 आमदारांनी राष्ट्रवादीचा वेगळा गट तयार करुन आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला. त्यानंतर महायुतीसोबत निवडणुका लढवून सत्तेत सामिल झाले आहेत. या संपूर्ण घ़डामोडींमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगल्याचं दिसून आलं. अशातच आता बारामतीतल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी काकांबद्दल मिश्किल वक्तव्य केलंय. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढं काही चालत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे खरंच तक्रार केली का? अजितदादांनी क्लिअरच केलं..
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काका कुतवळ यांना मी रस्त्याबाबत सांगितलंय, मी म्हणालो सहकार्य करा, याशिवाय मी तहसिलदार, बीडीओ, स्थानिक पोलिस निरीक्षकांनादेखील आदेश दिलेत. मी त्यांना म्हटलं काकांनाही विश्वासात घ्या. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे काही चालत नाही. काका लोकं म्हणजे कुतवळ यांना नाहीतर ही माध्यमं लगेचच चर्चा करतील की अजितदादा घसरले कोणावर घसरले याचीच चर्चा होईल, असं अजित पवार म्हणाले आहेत.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बजावली नोटीस
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी दावा केल्यापासून अजित पवार हे शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पक्ष आणि पक्षफफुटीवर किंवा शरद पवारांवर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. आज मात्र त्यांनी कुतवळ यांचा उल्लेख करीत केलेल्या वक्तव्याची सर्वत्रच चर्चा सुरु आहे.