Ajit Pawar News : धनंजय मुंडे माझ्याही जवळचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असल्याची गुगली उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांच्यासमोरच टाकली आहे. दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर दिसून आले आहेत. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
तीन राज्यात विजय, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प : भाजपची पावलं ओळखत CM शिंदे लागले तयारीला
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातही आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. एकीकडे महायुतीचं सरकार स्थापन झालंय तर दुसरीकडे महाविकास सरकारकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालीयं. अशातच शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपसोबत सामिल झाल्याने भाजपचे अनेक नेत्यांकडून नाराजीचा सूर आवळण्यात येत आहे. त्यापैकीच एक म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे असल्याची चर्चा होती. पंकजा मुंडे यांनी मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. भाजपमध्ये पंकजाताईंची घुसमट होत असल्याचंही बोललं जात होतं. त्यावर मी लेचीपेची नसल्याचं स्पष्टीकरणही मुंडेंनी दसरा मेळाव्यात दिलं होतं.
रस्ते अपघातातील जखमींना मिळणार मोफत उपचार : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आज राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसून आल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते. बीडच्या राजकारणातले कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे मुंडे भाऊ-बहिणी एकाच मंचावर होते. या कार्यक्रमासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी धनंजय आणि पंकजा मुंडेंचा मिलाप घडवून आणला. एकाच हेलिकॉप्टरने सर्व नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. एवढंच नाहीतर बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा आवाहनही करण्यात आलं आहे.
Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
माझ्याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. कोणी म्हणतं या पक्षात चालले तर कोणी म्हणतयं या पक्षात, पण पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं न देता निष्ठा काय असते ते जनतेला विचारा. निवडणुकीत मी पडले तर पडले पण ब्रम्ह, विष्णू महेशसुद्धा युद्धात हरले आहेत. या त्रिदेवांनाही संकट होते, तर युद्धाला आपण का नाही तयार राहणार. हजार वेळा हरलात तरी लोकं तुमच्या गळ्यात सन्मानाने हार घालतात. माझी निष्ठा एवढी लेचीपेची नाही, असं पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं होतं.
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आली आहे. या कार्यक्रमानंतर पुढील राजकीय गणितं बदलणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पंकजा मुंडे जर नाराज असतील तर भाजप त्यांची नाराजी दूर करणार का? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंना दिलेला सल्ला कितपत याेग्य ठरणार? हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.