तीन राज्यात विजय, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प : भाजपची पावलं ओळखत CM शिंदे लागले तयारीला

तीन राज्यात विजय, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प : भाजपची पावलं ओळखत CM शिंदे लागले तयारीला

मुंबई : लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या बंपर विजयानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे. अशातच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार असल्याचा संकल्प केला. त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले.

भाजपची हीच पावलं ओळखत आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष तयारीला लागला आहे. शिंदे यांनी आज (6 डिसेंबर) राज्यात शिवसेनेच्या विभागीय संपर्क नेत्यांची आणि लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण आणि बारामती असे नऊ मतदारसंघ वगळता 39 मतदारसंघांमध्ये लोकसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. तर सर्व 36 जिल्ह्यांचे विविध विभाग करुन तिथे विभागीय संपर्क नेत्यांची नियुक्ती केली आहे. (Chief Minister Eknath Shinde announced the appointments of Shiv Sena Divisional Liaison Leaders and Lok Sabha Observers)

विभागीय संपर्क नेते :

1. कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग – उदय सामंत

2. कोकण : ठाणे, पालघर – नरेश म्हस्के

3. मुंबई : मुंबई शहर, मुंबई उपनगर : सिद्धेश कदम, किरण पावसकर

4. मराठवाडा : नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिव – आनंदराव जाधव

5. मराठवाडा : जालना, संभाजीनगर, परभणी, बीड – अर्जुन खोतकर

6. उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर – भाऊसाहेब चौधरी

7. पश्चिम महाराष्ट्र : सातारा, सांगली, कोल्हापूर – विजय शिवतारे

8. पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सोलापूर – संजय मशीलकर

9. पूर्व विदर्भ : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली – दीपक सावंत

10. पश्चिम विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती – विलास पारकर

11. पश्चिम विदर्भ : वाशिम, यवतमाळ, वर्धा – विलास चावरी

लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या :

1. राजेश पाटील – नंदुरबार

2. प्रसाद ढोमसे –  धुळे

3. सुनील चौधरी – जळगाव

4. विजय देशमुख – रावेर

5. अशोक शिंदे – बुलढाणा

6. भूपेंद्र कवळी – अकोला

7. मनोज हिरवे – अमरावती

8. परमेश्वर कदम – वर्धा

9. अरुण जगताप – रामटेक

10. अनिल पडवळ – नागपूर

11. आशिष देसाई भंडारा – गोंदिया

12. मंगेश काशीकर – गडचिरोली- चिमूर

13. किरण लांडगे – चंद्रपूर

14. गोपीकिशन बजोरीया – यवतमाळ-वाशिम

15. सुभाष सावंत – हिंगोली

16. दिलीप शिंदे – नांदेड

17. सुभाष साळुंखे – परभणी

18. विष्णू सावंत – जालना

19. अमित गिते – छत्रपती संभाजी नगर

20. सुनील पाटील – दिंडोरी

21. जयंत साठे – नाशिक

22. रवींद्र फाटक – पालघर

23. प्रकाश पाटील – भिवंडी

24. मंगेश सातमकर – रायगड

25. विश्वनाथ राणे – मावळ

26. किशोर भोसले – पुणे

27. अशोक पाटील – शिरूर

28. अभिजित कदम – नगर

29. राजेंद्र चौधरी – शिर्डी

30. डॉ विजय पाटील – बीड

31. रवींद्र गायकवाड – धाराशिव

32. बालाजी काकडे – लातूर

33. इरफान सय्यद – सोलापूर

34. कृष्णा हेगडे – माढा

35. राजेश क्षीरसागर – सांगली

36. शरद कणसे – सातारा

37. राजेंद्र फाटक – रत्नागिरी-सिंधुदुर्ग

38. उदय सामंत – कोल्हापूर

39. योगेश जानकर – हातकणंगले

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube