Download App

एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे खरंच तक्रार केली का? अजितदादांनी क्लिअरच केलं..

जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील.

Ajit Pawar on Eknath Shinde : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रायगड दौऱ्यावर होते. अमित शाहांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फायलीच्या मुद्द्यावर अमित शाहांकडे तक्रार केल्याचे समोर आले होते. अर्थ खात्याकडून आमच्या फायली क्लिअर होत नाहीत अशी तक्रार होती. शिंदे यांनी थेट कार्यक्रमातच ही तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आता यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) एकाच वाक्यात उत्तर देत या चर्चांना फुलस्टॉप दिला. शिंदेंनी अशी कोणतीही तक्रार केली नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार सातारा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले. त्यावर अजित पवार म्हणाले, मला याबाबत अमित शाह यांनी कोणतीच विचारणा केलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही जे सांगताय ते आधी बंद करा. जर एकनाथ शिंदे यांना काही सांगायचंच असेल तर ते तक्रार करतील असं मला वाटत नाही. एकतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील, माझ्याशी बोलतील किंवा पीएशी बोलतील.

मुख्यमंत्री फडणवीस अन् एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; पुण्यात मध्यरात्री काय खलबतं?

सरकारच्या विविध निर्णयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही दर आठवड्याला एकत्र येतो. चर्चा करून प्रश्नांवर मार्गही काढला जातो. त्यामुळे आमचे संबंध चांगले आहेत असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन महायुतीत काही धुसफूस नाही असे सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. यावर आता शिंदे गटातील नेत्यांकडून का प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे

अमित शाह काल रायगड दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे अर्थ खात्याची तक्रार केली. अर्थखात्याकडून आमच्या फायलींवर सह्या होत नाहीत. फायली मंजूर होत नाहीत अशी तक्रार केली होती.

Waqf Board Bill : धमकावतायं काय तुम्ही? कायदा स्वीकारावाच लागणार, अमित शाह विरोधकांवर बरसले

follow us