Devendra Fadnavis : राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. यावरून चांगलच राजकारण तापलं. या घटनेवरून शरद पवारांनी (Sharad Pawar) महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार टीका केली. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला असून कुठं भ्रष्टाचार करायचं याचं तारतम्य सुध्दा या सरकारमध्ये नाही, अशी टीका पवारांनी केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.
UPSC ला मला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही: पूजा खेडकरकडून आरोपांचे खंडन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. पुतळा कोसळल्याने पवारांनी सरकावर टीका केली होती. पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना हे माहित आहे की, हा पुतळा नेव्हीने तयार केलाय. हा पुतळा राज्य सरकारने तयार केला नाही. एखाद्या ठिकाणी भ्रष्टाराचाराचे तारतम्य, अन् दुसरीकडे नाही, असं कसं म्हणता येईल? भ्रष्टाचार कुठंच व्हायला नको. भ्रष्टाराचाला आपला विरोधच असायला हवा. पवार साहेबांचाही भ्रष्टाचाराला विरोधच हवा. ते असं वक्तव्य करत असतील तर ते भ्रष्टाचाराला समर्थने देतात का? असं फडणवीस म्हणाले.
Asian Champions Trophy भारतीय हॉकी संघाची घोषणा, चीनमध्ये ‘हे’ 18 खेळाडू करणार कमाल!
नेव्ही कारवाई करणार…
पुढं ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कोणीही राजकारण करू नये. पुतळा कोसळला ही घटना दु:खद आहे. अशा प्रकराची घटना झाल्यावर त्याची योग्य चौकशी झाली पाहजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. नेव्हीने ही गोष्ट गांभीर्याने घेत चौकशी समिती तयार केली. नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल, असं फडणवीस म्हणाले.
खालचं राजकारण करू नका…
मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की, नेव्हीला मदत करून शिवरायांचा पुतळा उभारणार आहोत. जे जे करणं आवश्यक आहे, ते केलं जातंय. मात्र, केवळ राजकारण करायचं हे विरोधकांचं जे काही सुरू आहे, ते चुकीचं आहे. विरोधकांनी खालचं राजकारण करू नये, असं फडणवीस म्हणाले.
पुतळा उभारतांना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला नाहीये…
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतांना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या उद्घाटनाला उपस्थित होते. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिखाव्यासाठी हे सर्व करण्यात आलं, त्यामुळं हे शिवप्रेमी नसून शिवद्रोही असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.