Devendra Fadnavis Reaction on Anjali Damania Tweet : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) काल ट्विट करत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या (Chhagan Bhujbal) वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. मंत्री भुजबळ यांनीही स्वतः अशा चर्चा फेटाळून लावल्या. तरी देखील भुजबळांचे आगामी डावपेच काय असतील याची चर्चा सुरुच आहे. आता या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करण्यामागे काय याचाही खुलासा केला.
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भुजबळही ओबीसींसाठी आवाज उठवत होते. याच दरम्यन अंजली दमानिया यांनी भुजबळांवर टीका केली होती. आताही पुन्हा ट्विट करत त्यांनी भुजबळ आणि भाजपावर निशाणा साधला होता. भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप असे ट्विट दमानिया यांनी केले होते.
Devendra Fadnavis : ‘मी मुर्खांना उत्तरं देत नाही’ राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीसांचा संताप
पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया सध्या सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षात आहोत, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
माझ्या पक्षात माझी घुसमट नाही : भुजबळ
दरम्यान, दमानिया यांचा दावा भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. भुजबळ म्हणाले की, ‘त्यांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. मला कुठल्याही पदाची हौस नाही. अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. असे काही प्रपोजल मला आलेले नाही. तसेच माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही. अजून माझ्या पक्षात कोणी माझ्याविरुद्ध काही बोलत नाही. तसेच अजित पवार देखील मी माझ्या समाजाचे काम करत असल्याने त्याला विरोध करत नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.
Chhagan Bhujbal : नोव्हेंबरमध्येच भुजबळांनी दिला राजीनामा?, CM शिंदेंनी पुढं काय केलं