Devendra Fadnavis : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल दिवसभरात ठिकठिकणी आंदोलने केली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेस नेत्यांनीही संताप व्यक्त करत भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. या सगळ्या घडामोडींनंतर भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हाही दाखल करण्यात आला. सत्ताधरी भाजपाच्या नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत भिडे यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर सरकार ते तपासून पाहिल आणि सरकारला वाटेल त्या पद्धतीने कार्यवाही करील असे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
INDIA आघाडीत उद्धव ठाकरेंना शक्तिप्रदर्शनाची संधी… पण शरद पवारांमुळे मिळेना मुहूर्त!
ते म्हणाले, संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे. त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक महानायक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं पूर्णपणे अनुचित आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरुजींनी काय कुणीच करू नये. कारण, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे कोट्यावधी लोकांचा संताप होतो. महात्मा गांधी यांच्या विरोधात असं बोललेलं लोक कधीच सहन करणार नाहीत. या संदर्भात जी उचित कार्यवाही करायची आहे ती राज्य सरकार करील. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही.
‘आनंद दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका, ते निष्ठावंत शिवसैनिक’; राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
संभाजी भिडे यांचा भाजपशी काहीच संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. त्यामुळे याला राजकीय रंग देण्याचं काहीच कारण नाही. याचा निषेध करत जसे काँग्रेसचे लोकं रस्त्यावर उतरत आहेत तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळी राहुल गांधी बोलतात त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. पण त्यावेळेस हे लोक मिंधे होतात. कोणत्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही.