Download App

उद्धवजींच्या डोक्यावरील ताबा सुटलाय, ते सध्या फ्रस्ट्रेशमध्ये…; फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला. ते फ्रस्ट्रेशनमध्ये. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार?

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी टीका करत विधानसभा निवडणुकीत भाजपची (BJP) कबर महाराष्ट्रात बांधा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. ठाकरेंच्या या टीकेला आता उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

उद्धवजींच्या डोक्यावरील ताबा सुटलाय, ते सध्या फ्रस्ट्रेशमध्ये…; फडणवीसांचा पलटवार 

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत? एखादी व्यक्ती फस्ट्रेशनमध्ये टोकं बिघाडल्यासारखी बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचं नसतं. मात्र हे भाषण देऊन त्यांनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचे दाखवून दिले.

अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका 

ठाकरेंची टीका काय?
आता लोकसभेत जेवढे वळ भापजच्या आणि गद्दारांच्या पाठीवर उठलेत, त्यापेक्षा अधिक वळ विधानसभेच्या निकालात उठतील. त्यानंतर तुमची वळवळ कायमची थांबलेली असेल. ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याचप्रमाणे भाजपची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी अमित शाहांना यापुढं अहमद शाह अब्दालीच म्हणणार. मला तुम्ही नकली संतान म्हणालात तेव्हा लाज नाही वाटली. मला तुम्ही औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणताना तुमची जीभ नाही अडखळत, मग तुम्ही अहमद शाह अब्दाली आहात, हे बोलायला मी का घाबरू?, अशी टीका फडणवीसांनी केली.

follow us