Download App

‘देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता..,’; फडणवीसांचा डायलॉगबाजीतून इशारा

देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक इशाराच दिलायं. ते सोलापुरात बोलत होते.

Devendra Fadanvis : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. अशातच सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. नेत्यांचे विविध मतदारसंघात मेळावे आणि दौरे सुरु आहेत. अशातच सोलापुरातील आयोजित सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadanvis) वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलंय. . देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक इशाराच दिलायं.

बाजीरावचा ‘Singham Again’ या दिवशी ओटीटीवर होतोय रिलीज! कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की, 106 आमदार निवडून द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. मग सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला ना? तुम्ही मला 106 वा आमदार दिला आणि आपलं सरकार, महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणलं. तुम्हाला दुसरं आश्वासन दिलं होतं की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात पाणी आणून दाखवेन. एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसणार भाऊ कदम, 12 ऑक्टोबरला होणार नव्या नाटकाचा शुभारंभ

तसेच तुम्ही समाधान आवताडे यांना एक मत दिलं आणि त्यांनी देखील तुमचं समाधान करून दाखवलं. युतीच्या सरकारमध्ये आपण अनेक योजना सुरु केल्या. मात्र, मध्यंतरी १५ वर्ष या सर्व योजना बंद होत्या. लोक म्हणायचे पाणी पोहचू शकत नाही. मात्र, आपलं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारची मदत घेतली आणि सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन.

हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी अन् भारताचा शानदार विजय, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा

आज साताऱ्यातील काही तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हटलं जायचं. पण आज ते तालुके दुष्काळी राहिले नाहीत. हे काम साताऱ्यात करून दाखवलं आहे. तेच काम सांगलीत देखील करून दाखवलं आहे. मागच्या काही काळाच सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

follow us