सुप्रिया सुळे माझी जेवढी काळजी घेतात, त्यापेक्षा 10 टक्के जरी शरद पवारांनी (Sharad Pawar) योग्यवेळी काळजी घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) लगावला आहे. दरम्यान, पुण्यात आज संघटनात्मक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे…
बलात्काराचे आरोप झालेल्या नेत्याचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल, कॉंग्रेसने केली हकालपट्टी
सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यात दिसत नाहीत ते फक्त विमातळावरच दिसत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली होती. सुळेंच्या याच टिकेवरुन फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हिंदूंकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर नजर जाग्यावर ठेवणार नाही; नितेश राणेंचा इशारा
सुप्रिया सुळेंनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरही देवेंद्र फडणवीसांवर ताशेरे ओढले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून तेव्हापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचं सुळे म्हणाल्या होत्या. सुळेंच्या या टिकेलाही फडणवीसांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर
फडणवीस म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडीचा गृहमंत्री होता त्यावेळेस राज्यात किती आलबेल होतं. त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, गृहमंत्र्यावर 100 कोटींचे आरोप लागत नव्हते, साक्षीदारांच्या हत्या केल्या जात नव्हत्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती चांगलं काम होतं होतं, सचिन वाझे तर लादेन नव्हताच… त्यामुळे आता याच्यावर काय उत्तर द्यायचं, लोकं भूमिका बदलत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….
तुम्ही पुरावा द्या, मी चौकशी करतो…
तलाठी भरती प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नूसतेचं वक्तव्य केली आहेत. त्यांनी वक्तव्य न करता पुरावा दिला तर चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच राज्यात तलाठी पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच पूर्ण झाली असून कोणत्याही परिक्षेचा पुरावा दिला तर आम्ही परिक्षाच रद्द करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.