Download App

‘राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट..,’; बावनकुळेंच्या कथित व्हायरल फोटोवर फडणवीस बोलले

Devendra Fadnvis : संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा कथिक फोटो खासदार संजय राऊतांनी पोस्ट केला होता. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात विरोधकांकडून बावनकुळेंवर जोरदार टीका करण्यात आलीयं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हॉटेलमध्ये रेस्टॉरंट अन् कसिनो एकाच..,’; व्हायरल फोटोवर बावनकुळेंची सारवासारव

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं, असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा

तसेच संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“कोणी उपोषणाला बसले अन् अंतिम मुदत दिली म्हणून…” : मागासवर्ग आयोगाने जरांगेंना फटकारले

व्यक्तिगतपणे लक्ष्य केलं जात आहे यापेक्षा खालची पातळी काय असू शकते. ते असे मॉर्फ केलेले फोटो, कापलेले फोटो पोस्ट करून वाईट आरोप करत आहेत. हे राजकारणाची पातळी खाली नेणंच असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

काय म्हणाले होते राऊत?
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us