…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं; कपिल देवच्या आमंत्रणावरून राऊतांचा निशाणा
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी रविवारी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी बोलवण्यात आलं नाही. यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सामना बघायला येणे. त्याचे राजकारण करणे यावरून देखील टीका केली आहे.
…तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं
या पराभवावरून भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले, भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशामध्ये खेळाडू वृत्ती आहे. तसेच खेळांमध्ये हारजित होत असते. भारताचा हा पराभव अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा पराभव झाला आहे. कारण क्रिकेटचे अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईमध्ये वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली आहे. एका राज्याची त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियम चे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले आहे.
Box Office Collection: ‘टायगर 3’च्या कमाईत घट कायम; 8व्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
तसेच या विश्वचषकातील अंतिम सामना पाहण्यासाठी माजी क्रिकेटपटू आणि 1983 ला पहिला विश्वचषक जिंकणारा कर्णधार कपिल देवला आमंत्रित करण्यात आलं नाही. त्यावरून राऊत म्हणाले की, सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवचं तिथे आगमन झालं असतं तर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण. पडद्या मागचे राजकारण काल झालं भविष्यात त्याचं नक्कीच चर्चा होणार. क्रिकेटची पंढरी मुंबई मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं पैसा घेऊन जायचं कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं आहे.
Mumbai Crime : चक्क सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; कुर्ला परिसरातील धक्कादायक घटना
तसेच सामना या ठिकाणी ठेवला. यामागे भारतीय पक्ष सर्व आपल्याकडे श्रय घेण्याचा विचार होता. हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया नसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष, आता हरलात ना? भारतीय संघ उत्तम खेळला हरले असले तरी त्यांचा अभिनंदन केलं पाहिजे व दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. मी संघावर व्यक्तिगत टीका टीपनी करणार नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता. मात्र ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाकडून राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले.